लसीकरणाचा वेग मंदावला; 22 जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग अधिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लसीकरणाचा वेग मंदावला; 22 जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग अधिक

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्ण संख्या देखील कमी होत आहे. याचबरोबर केंद्र सरकार लसीकरणाला प्राधान्य देत असले तरी, जुलै महिन्या

सिक्कीममध्ये हिमस्खलन, 7 पर्यटकांचा मृत्यू
माण तालुक्यात सातारा आगाराची बस जळून खाक
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील परीची हिंदी मालिकेत एन्ट्री

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, रुग्ण संख्या देखील कमी होत आहे. याचबरोबर केंद्र सरकार लसीकरणाला प्राधान्य देत असले तरी, जुलै महिन्यात लसीकरणांचे जे लक्ष्य गाठायचे होते, ते गाठता आलेले नाही. तर देशातील 22 जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर सर्वाधिक असल्यामुळे केंद्र सरकार समोरची चिंता वाढली आहे.
कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असले, तरी हे प्रयत्न अपुरे पडतांना दिसून येत आहे. देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र गेल्या काही काळापासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र दिसून येत आहे. याच गतीने जर लसीकरण होत राहिले तर देशाचे लसीकरणाचे लक्ष्य गाठणे अवघड होणार असल्याचे चित्र दिसत आहे. जुलै महिन्यात 13 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचं लक्ष्य देशासमोर आहे. मात्र, या महिन्याभरात म्हणजे गेल्या रविवारपर्यंत 9.94 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे. म्हणजे सरासरी प्रतिदिन 38.26 लाख डोस. जर याच गतीने लसीकरण सुरू राहिले तर जुलै महिना संपेपर्यंत देशात 12.5 कोटी डोस दिले जातील. जर या महिन्याचे 13 कोटींचे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर प्रतिदिन सरासरी 60 लाख डोस देणे आवश्यक आहे. मात्र, हा आकडा या महिन्यात केवळ दोन वेळा गाठला आहे.18 वर्षांवरील सर्वांच्याच लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून म्हणजे 21 जूनपासून लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. त्याच वेळी जुलै महिन्याच्या 13. 5 कोटी लसीकरणाच्या लक्ष्याची घोषणा करण्यात आली होती. अधिकृत माहिती असे दर्शवते की, जूनच्या शेवटच्या आठवड्यात लसीच्या साप्ताहिक डोसची संख्या सर्वाधिक म्हणजे 4.8 कोटी होती, मात्र 25 जुलैला संपणार्‍या आठवड्यामध्ये हे प्रमाण 2.8 कोटींवर आले आहे. मात्र, जुलैपर्यंतच्या 27 आठवड्यांच्या सरासरी प्रमाणापेक्षा हे प्रमाण नक्कीच जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 29 हजार 689 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 415 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दरम्यान, देशभरात अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर रुग्णसंख्या आणि मृत्यूदर या आधारावर अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणावर लसीकरणाचा कार्यक्रम देखील हाती घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही भारतात आणि जगभरात रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसून ती चिंतेची बाब असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जागतिक पातळीवर अजूनही करोनाच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आह. जागतिक स्तराचा विचार केला, तर अजूनही करोना संपण्यासाठी बराच कालावधी जायचा आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आपल्याला अत्यंत कठोरपणे काम करावे लागणार आहे, असे म्हणत आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.

COMMENTS