Homeताज्या बातम्यादेश

देशात परिवर्तनाची सुरूवात ः शरद पवार

इंडिया आघाडीकडून संख्याबळासाठी जुळवाजुळव

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असतांना कोणत्याच पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळत नसल्याने इंडिया आघाडीने संख्याची जुळवा-जुळवा करण्यास सुरूव

…तर, लोक म्हणतात तो देवेंद्रवासी झाला  
वय काढू नका, हा गडी थांबणार नाही
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीचे निकाल येत असतांना कोणत्याच पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळत नसल्याने इंडिया आघाडीने संख्याची जुळवा-जुळवा करण्यास सुरूवात केली आहे. एनडीएमध्ये असलेले तेलगु देसमचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार यांना आपल्या गोटात घेण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत, सांगितले की, देशातील वातावरण आशादायी असून देशात परिवर्तनाची सुरूवात दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या. त्यात 7 जागांवर आम्हाला आघाडी आहे. याचा अर्थ आमचा स्ट्राइक रेट उत्तम आहे. हे केवळ आमचे यश नाही. महाविकास आघाडीचे यश आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही चांगले यश मिळाले आहे. आम्ही यापुढेही एकत्रितपणे काम करू. देशपातळीवरचे चित्र आशादायक आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशने दिला आहे. यापूर्वी भाजपला उत्तरप्रदेशात जे यश मिळायचे, त्याचे मार्जिन निर्णायक असायचे. आता त्यांना खूप मर्यादित स्थान राहिले. आम्ही यापुढे अधिक लक्ष दिले तर उत्तरेचा चेहरा बदलायला मदत होईल. ती काळजी आम्ही घेऊ अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. खासदार शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू होती. यासाठी शरद पवारांनी नितीशकुमार यांना फोन केल्याचे चर्चा सुरू होती, मात्र ही चर्चा शरद पवारांनी फेटाळून लावली आहे. इंडिया आघाडीकडून नितीशकुमारांना उपपंतप्रधान पदाची दावेदारी देण्यास इंडिया आघाडी तयार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेण्यासाठी आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्‍वासन इंडिया आघाडीकडून देण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र पवारांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.  

नितीश कुमार आणि चंद्राबाबूंशी चर्चा झालेली नाही ः शरद पवार – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझी नितीशकुमार आणि चंंद्राबाबूंशी चर्चा झाल्याच्या बातम्या येत आहेत, पण त्यात तथ्य नाही. माझी चर्चा फक्त काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सीताराम येचुरी यांच्याशी झाल्याचे शरद पवारांनी सांगितले.

COMMENTS