Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाईन जुगार ची जाहिरात करणा-या तेंडुलकर साठी मागितली भीक 

नाशिक  :-  भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन जुगार गेम ची जाहिरात केल्याने जनसामान्यांच्या भावना तीव्र झाल्या असुन कोट्यवधी चाहत्यांच्या आयडाॅल

शहीदांच्या कुटुंबीयांप्रती उदारपणा दाखवावा
पढेगाव ग्रामपंचायतकडून महिलांचा सन्मान
सुशासनातून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल : पंतप्रधान मोदी

नाशिक  :-  भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन जुगार गेम ची जाहिरात केल्याने जनसामान्यांच्या भावना तीव्र झाल्या असुन कोट्यवधी चाहत्यांच्या आयडाॅल सचिन तेंडुलकर यांच्या या घटने विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हाप्रमुख अनिल भडांगे यांनी पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सह ठक्कर बाजार, त्र्यंबक नाका परिसरात भिक मागुन रुपये गोळा केले, लवकरच त्यांना मनिऑर्डर करण्यात येईल, देशाचा सर्वोच सन्मानाचा असलेल्या भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती कडुन अशा प्रकारच्या जाहिराती होणे हे दुखदायी व युवा पिढी साठी घातक असल्याचे जिल्हा प्रमुख आनिल भडांगे यांनी सांगितले, तेंडुलकर यांनी  भारतरत्न पुरस्कार परत करावा अन्यथा येणा-या गणेशोत्सव मध्ये तेंडुलकर साठी भीक नावाचे बाॅक्स ठेवुन ती जमा रक्कम ही त्यांना पाठवण्यात येईल असे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने सांगितले यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, जिल्हा संघटक दिलीप पाटील, शहर उपप्रमुख संजय तिवडे, सातपुर विभाग प्रमुख आशिष महाले व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS