Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्य यंत्रणा सक्षम करणे यावर भर देणे गरजेचे : महापौर

पुणे शहरातल्या सध्याच्या रुग्णसंख्येसाठी पुरेशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

हनुमान जन्मस्थळावरून महंत भिडले ; पाहा व्हिडीओ I LOKNews24
प्रियदर्शनी मुंडे, पृथ्वीराज मुंडेचे अबॅकस आंतरराष्ट्रीय परिक्षेत यश
काव्यप्रहार

पुणे : पुणे शहरातल्या सध्याच्या रुग्णसंख्येसाठी पुरेशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउन लावु नये अशी भुमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. शहरासाठी चाचण्या वाढवणे, लसीकरण वाढवणे आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करणे यावर भर देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. पुण्यामध्ये आज ४५ वर्षांच्या वरच्या लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. याच टप्प्यामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लस घेतली.

त्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे, असे आवाहन केले आहे. मोहोळ म्हणाले, देशभरात लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु होत आहे. पहिल्या तीन टप्प्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकही मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. आज चौथा टप्पा सुरु झाला. ४५ वरील नागरिकांना लस दिली. आत १०० टक्के लोकांनी लस घेण्याचे आवाहन मी करत आहे. पुणे शहरात लसीचा तुटवडा नाही. ११४ केंद्रे आहे. ३ लाख ६० हजर नागरिकांना लस देण्यात आली आहे. आजही आपल्याकडे लसीचा साठा चांगला आहे. आपल्याला कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून १ लाख ४५ हजार लस मिळाल्या आहेत. त्याचेही नियोजन सुरु आहे. पुणे जिल्हा मिळून एक लाख लसीकरणाचे टार्गेट ठेवले आहे. पुढच्या काळात हि संख्या वाढवायची आहे. आज आम्ही दिवसाला १५ हजार लसीकरण करत आहोत.

COMMENTS