बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत अंतर्गत गणेशनगर वस्तिवरील ग्रामस्थांना दवाखाना, शाळकरी मुले, दुध उत्पादक, किराणा सामान, भाजीपाला विक्रेते आदिंन
बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत अंतर्गत गणेशनगर वस्तिवरील ग्रामस्थांना दवाखाना, शाळकरी मुले, दुध उत्पादक, किराणा सामान, भाजीपाला विक्रेते आदिंना चिखलवाट तुडवित जावे लागत असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर ठीय्या आंदोलन करून चक्का जाम केला.
लिंबागणेश ते बेलेश्वर शिवरस्ता दरवर्षीच पावसाळ्यात चिखलमय असल्या कारणाने गणेश नगर वस्तिवरील ग्रामस्थांना दवाखान्यात जाण्यासाठी तसेच शाळकरी मुले, दुध उत्पादकांना डेअरीवर दुध घालण्यासाठी,भाजीपाला विक्रेते ,किराणा सामान आदिसाठी गुडघाभर पाण्यातुन चिखलवाट तुडवित जावे लागते. या विषयी प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून वारंवार निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होत असल्या कारणाने अखेर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्विकारला. या चक्का जाम आंदोलनाचे निवेदन एपीआय नेकनूर पोलीस स्टेशन शेख मुस्तफा , उपनिरीक्षक विलास जाधव, सहाय्यक फौजदार इसाक शेख ,मंडळ अधिकारी वंजारे यांना देण्यात आले.
आंदोलनात चंद्रकांत आवसरे, खाजु शेख, रविंद्र वायभट, प्रविणवायभट, आदि शाळकरी मुलासह महिलांनी सहभाग घेतला होता .
COMMENTS