Beed : परळी शहरातून तब्बल 140 गाढवं चोरीला (Video)

Homeशहरंबीड

Beed : परळी शहरातून तब्बल 140 गाढवं चोरीला (Video)

 दुचाकी, मोबाईल यासह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील मात्र बीडच्या परळी शहरातून चक्क 140 गाढव चोरीला गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर हा प

शेतकरी संकटाच्या खाईत असताना लाखो रुपयाची उधळ पट्टी कशासाठी
श्री सिद्धेश्वर विद्यालय, माजलगाव -1978 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय गेट-टुगेदर उत्साहात
Beed : माजलगाव कराटे मार्शल आर्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी !

 दुचाकी, मोबाईल यासह इतर चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील मात्र बीडच्या परळी शहरातून चक्क 140 गाढव चोरीला गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर हा प्रकार खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शहरात घडला आहे.परळी शहरात वीटभट्टीसह इतर कामांसाठी भोई, बेलदार आणि वडार समाजाकडे गाढवे आहेत. मात्र मागील पंधरा दिवसांपासून एक एक करत तब्बल 140 गाढवे चोरीला गेली आहेत. या संदर्भात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गाढवांच्या मालकांनी धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. दरम्यान काम नसले की, ही गाढवे शहरात सोडून दिली जातात. जेव्हा कामाची गरज लागेल तेव्हा त्यांचा शोध मालकांकडून घेतला जातो. त्यामुळे त्यांनी गाढवांची खरेदी कुणाकडे केली होती? आणि त्याचे दाखले मिळाल्यास गाढवे शोधण्यासाठी मदत होईल. त्या मदतीच्या आधारे शोध घेतला जाईल. दरम्यान या प्रकरणात खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती देऊन शोध सुरू आल्याचं सांगितले आहे.

COMMENTS