सातारा / प्रतिनिधी : शासन गतिमान आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. शासनाच्या धोरणाने अंत्यंत सुलभपणे आपल्याला शास

सातारा / प्रतिनिधी : शासन गतिमान आहे. प्रशासकीय कामकाज गतिमान करणे हे आपल्या सर्वांचे ध्येय आहे. शासनाच्या धोरणाने अंत्यंत सुलभपणे आपल्याला शासकीय सेवेमध्ये नियुक्ती मिळाली आहे याची जाणीव ठेवून चांगले काम करा. शासनाच्या कल्याणकारी ध्येय धोरणांचा सर्वसामान्य घटकांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लाभ मिळवून द्या. शासन आणि जनता यामधला दुवा म्हणून काम करा. पालकमंत्री म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहिन, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व जिल्हा प्रशासन यांच्यावतीने अनुकंपा उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे लिपिक टंकलेखक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण कार्यक्रम पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षेतेखाली स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झाला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराज, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, तहसीलदार शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गतिमान प्रशासनाला आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले पाहिजे हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनातील रिक्त असणारी पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 17 जुलै 2024 रोजी अनुकंपा भरतीचा अत्यंत सुटसुटीत असा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती राधा यांनी तयार केला. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. सातारा जिल्ह्यातही आपण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करुन अनुकंपा धोरणानुसार 172 आणि उर्वरित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील अशा जवळपास 248 नियुक्त्या दिल्या आहेत.

COMMENTS