मेडद किल्ला परिसराचे सुशोभीकरण करा :  उपमुख्यमंत्री पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेडद किल्ला परिसराचे सुशोभीकरण करा : उपमुख्यमंत्री पवार

बारामती दि. २२ : मेडद येथील किल्ल्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. किल्ल्यामध्ये असलेली जिल्हा परिषदेची शाळा व ग्रा

‘एकच बायको सात जन्मी नको’ औरंगाबादेत पुरुषांनी केलं पिंपळाचं पूजन! l पहा LokNews24
मणिपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून रस्त्यावर फिरवलं
मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खामोशी से सुनता हूं, जबाब देने का हक मैं ने वक्त को दे रखा हैं… भुजबळांचा इशारा

बारामती दि. २२ : मेडद येथील किल्ल्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. किल्ल्यामध्ये असलेली जिल्हा परिषदेची शाळा व ग्राम सचिवालय अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबत संबधितांनी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती परिसरात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज पाहणी केली. यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, सा. बा. वि. चे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

किल्ल्याच्या शेजारील अतिक्रमण काढण्यात यावे असेही श्री.पवार यांनी सांगितले. श्री. पवार यांनी आज मौजे मेडद येथील नियोजित आयुर्वेदिक कॉलेजच्या इमारतीची जागा, मेडद येथील किल्ला, बारामती येथील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम इत्यादी ठिकाणच्या कामांची पाहणी केली. अपर पोलीस अधीक्षक, बारामती शहर पोलीस आणि वाहतूक विभागाच्या नवीन इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS