मुंबई : मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्य
मुंबई : मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज 8 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे 187 कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या एकाचवेळी 187 कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबईच्या सौंदर्यीकरणाबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह खासदार राहूल शेवाळे, आमदार आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, मुंबई सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या चार महिन्यात वेग देण्यात आला आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कोळीवाड्यांचे सौंदर्यीकरण, आपला दवाखाना यासारख्या निर्णयांमुळे गतिमान मुंबईच्या वैभवात भर पडणार आहे. जी 20 परिषदेच्या बैठका महाराष्ट्रात होत असून त्यातील पहिल्या बैठका ह्या मुंबईत होणार आहे. हा मान आपल्या राज्याला आणि मुंबईला मिळाला असून त्यासाठी शहराचा कायापालट करून त्यांचे ब्रँडींग जोरदारपणे करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
COMMENTS