Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीला त्रास देत असल्याचा जाब विचारल्यामुळे मारहाण

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः आमच्या मुलीला त्रास का देता अशी विचारणा केली असता  जबरदस्तीने घरात घुसून पती पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आ

कोपरगावमध्ये अवयवदान कार्यशाळा उत्साहात
उन्हाळी आर्वतनाचे पाणी मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक
भंडारदरा परिसर काजवा महोत्सवासाठी सज्ज

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः आमच्या मुलीला त्रास का देता अशी विचारणा केली असता  जबरदस्तीने घरात घुसून पती पत्नीला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली. फिर्यादी महिलेचा अंगावरील कपडे फाडून तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करण्यात आले. ही घटना राहुरी तालूक्यातील उंबरे येथे घडली.
                    उंबरे गावात एका महिलेने माझ्या मुलीला ञास का देता अशी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने त्या महिलेच्या घरात घुसुन महिला व तीच्या घरातील इतर लोकांना लाकडी दांड्याने व लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन महिलेच्या अंगावरील कपडे फाडुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेचा अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच तूम्ही या गावामध्ये रहावयाचे नाही. तुम्ही उद्या गावात दिसला तर तूम्हाला मारुन टाकुन घरदार पेटवुन देवू. अशी धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी महिलेच्या बहिनीच्या गळ्यातील सोन्याची पोत गहाळ झाली आहे. सदर महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या फिर्यादीत  आरोपी भारत भाउसाहेब गायकवाड, अनिल भाउसाहेब गायकवाड, प्रसाद आण्णासाहेब पाळंदे, रेखा आण्णासाहेब पाळंदे, सुनिता भारत गायकवाड, दिपाली अनिल गायकवाड सर्व रा. उंबरे ता. राहुरी.यांच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 354, 452, 324, 143, 147, 323, 504, 506, 427 प्रमाणे विनयभंग, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वाल्मिक पारधी हे करीत आहेत.

COMMENTS