Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारुसाठी पैसे न दिल्याने मारहाण

पाच जणांविरुद्ध अर्म अँक्टसह गुन्हे दाखल

जामखेड प्रतिनिधी - दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून सारोळा येथील अंगद सांगळे यांना तलवार, लोखंडी पाईप व दगडाने बेदम मारहाण करत खिश्यात

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य ; जिल्हाधिकारी डॉ. भोसले
पुणतांब्यात आज रेल्वे रोको आंदोलन
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल

जामखेड प्रतिनिधी – दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून सारोळा येथील अंगद सांगळे यांना तलवार, लोखंडी पाईप व दगडाने बेदम मारहाण करत खिश्यातून रोख 10 हजार रूपये, सोन्याची चैन व एक मोबाईल असा ऐवज काढून घेतला. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी दिनेश खरातसह पाच जणांविरुद्ध अर्म अँक्टसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  


सविस्तर असे की फिर्यादी अंगद किसन सांगळे (वय 46), रा सारोळा ता. जामखेड 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्कूटी क्र.एमएच 16 सीएल 5922  वरून खर्डा जामखेड रोडने गावाकडे जात असतांना आरोपी दिनेश खरात व सोबत असलेल्या चार जणांनी फिर्यादीस थांबवले. व दारू पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने पैंसे न दिल्याचा राग आल्याने दिनेश खरात याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करत हातातील तलवारीने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. व त्याचे सोबत असलेल्या इतर 4 अनोळखी आरोपींनी लोखंडी पाईप व दगडाने फिर्यादीस मारहाण करत गंभीर जखमी केले तसेच फिर्यादीच्या शर्ट व पँटच्या खिशातील 10 हजार रूपये रोख रक्कम, गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चैन, विवो कंपनीचा मोबाईल काढून घेतला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.  फिर्यादी गंभीर जखमी असल्याने अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अंगद किसन सांगळे यांचा जवाब घेतला त्यानुसार दिनेश खरात (पूर्ण नाव माहित नाही) रा.बटेवाडी ता. जामखेड व इतर चार जणांविरोधात अर्म अँक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करत आहेत.

COMMENTS