Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिनेस्टाईल पाठलाग करत राजकीय पुढार्‍याकडून मारहाण

तीन जण गंभीर जखमी ः रस्त्याचा जुना वाद

जामखेड/प्रतिनिधीः आमच्या रानातून का आले, असे म्हणत राजकीय क्षेत्रात मोठे नाव असलेल्या पुढार्‍यासह सहा ते सात जणांनी सिनेस्टाईल पाठलाग करत केलेल्य

सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही – काँग्रेस नेते आमदार थोरात
केडगाव मधील साथीच्या आजारांवर उपाय योजना सुरू करा – नगरसेवक मनोज कोतकर
मनपा पोटनिवडणुकीत उद्या उमेदवारीची उडणार झुंबड

जामखेड/प्रतिनिधीः आमच्या रानातून का आले, असे म्हणत राजकीय क्षेत्रात मोठे नाव असलेल्या पुढार्‍यासह सहा ते सात जणांनी सिनेस्टाईल पाठलाग करत केलेल्या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत पुढारी व सरपंचाचा या मारहाण करणार्‍यांमध्ये समावेश असल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर तेथे तातडीने हलविले आहे. तालुक्यातील हळगाव येथील ढवळे कुटुंबामध्ये गेल्या 6-7 वर्षापासुन शेतातील रस्त्यावरून वाद आहे. 12 मे रोजी अनिल तुकाराम ढवळे हे कुटुंबासह शेतात खत टाकण्याचे काम करत होते. दुपारी 12.30 च्या सुमारास प्रतिष्ठीत पुढारी किसन ढवळे हे 6-7 जणांसह हातात लाठ्या काठ्या घेऊन शेतात अचानक आले. आमच्या शेतातून का आले असे म्हणत मारहाण चालू केली. जीव वाचवण्यासाठी अनिल ढवळे व कूटुंबीय पळु लागले तेव्हा सिनेस्टाईल पाठलाग करून जबर मारहाण केली. यामध्ये अनिल तुकाराम ढवळे, सविता अनिल ढवळे, विशाल अनिल ढवळे हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर मारहाणीची घटना कोणीतरी मोबाईल कॅमेर्‍यात शुट केली आहे. त्यामध्ये राजकीय पुढारी किसन ढवळे व त्यांचे कुटुंबीय स्पष्ट दिसत आहेत. रस्त्याच्या वादातून यापूर्वी अनेकवेळा मारहाण झाली आहे. 2017 मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून वाद न्यायालयात चालू आहे. असे असतांना सदर आरोपींनी वारंवार मारहाण करून दहशत निर्माण केली आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. सदर घटनेतील प्रमुख आरोपीचे राजकीय क्षेत्रात मोठे नाव आहे. वारंवार जीव घेण्या हाणामार्‍या, दहशत निर्माण करणार्‍या या पुढार्‍याला कुणाचा राजकीय पाठिंबा आहे का? यांच्यावर कारवाई का होत नाही? अशी ग्रामस्थांमधुन चर्चा सुरू आहे. सदर घटनेची तक्रार पोलिसांकडे दिली आहे मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजले.

प्राणघातक हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल – राजकीय पुढारी किसनराव ढवळे, सरपंच अनिता सुसेन ढवळे, सुसेन किसनराव ढवळे, धनजंय किसनराव ढवळे, आकाश सुसेन ढवळे, प्रतीक धनंजय ढवळे या सर्वांनी मिळून अनिल तुकाराम ढवळे, आणि त्यांच्या कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

COMMENTS