Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परकीय आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज रहावे ः गोविंद जाटदेवळेकर

बेलापुरातील अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात समाप्ती

बेलापूर प्रतिनिधी ः आध्यात्मिक व्यासपीठच समाजाला एकसंघ ठेऊ शकते. ज्याने समाजासाठी जीवन समर्पित केले त्यांनाच उपदेश करण्याचा अधिकार आहे.दुर्दैवाने

जिल्हा परिषद आरक्षणाचा भल्या-भल्यांना बसला फटका
दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना
VIRAL VIDEO: भाऊंनी PPE किट घालून वरात गाजवली | पहा Lok News24*

बेलापूर प्रतिनिधी ः आध्यात्मिक व्यासपीठच समाजाला एकसंघ ठेऊ शकते. ज्याने समाजासाठी जीवन समर्पित केले त्यांनाच उपदेश करण्याचा अधिकार आहे.दुर्दैवाने मार्गदर्शक कसा असावा? याची दृष्टी राहिली नाही. त्यातून सतत काही चुकीच्या शक्ती डोके वर काढीत आहेत.त्यासाठी प्रत्येकाने जीवन जगताना राष्ट्रधर्म सर्वोपरी हे ब्रीद अंगिकारून परकीय आक्रमणे रोखण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन ह.भ.प. गोविंद महाराज जाटदेवळेकर यांनी केले. बेलापूर बुद्रुक येथील श्री केशव गोविंद मंदिरात शेजारती भक्त मंडळ व समस्त ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण व किर्तन महोत्सवाच्या समाप्ती निमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते.
यावेळी ह.भ.प. सोपानबुवा हिरवे, मोहन खानवेलकर आदी प्रमुख उपस्थित होते. ह.भ.प.गोविंद महाराज पुढे म्हणाले की, दुराचार हा अनेक पिढ्यांना नर्कात नेणारा आहे. मी कुणाकडे वाईट नजरेने पाहणार नाही आणि माझ्याकडेही कोणी तसे पाहण्याची हिम्मत करु नये अशी मानसिकता तयार करावी.लव्ह जिहाद सारख्या घटना रोखण्यासाठी युवती व महिलांनी समोरच्यांनी माय म्हणुन वाकून नमस्कार करावा असा पेहराव परिधान करावा. मुलांचे वय 24 व मुलींचे वय 21 या अवधीत विवाह करावेत.परकीय आक्रमणांची धग रोखण्याचे मोठे आव्हान समर्थपणे पेलण्यासाठी जे आपल्या कुळात आहे तेच कर्तव्य माणसाने करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की,शहरी भागांच्या तुलनेत खेड्यातील लोकांनी धर्म अधिक जपला आहे. माणूस भौतिक चंगळवादात गुरफटल्याने तो मुख्य प्रवाहापासून दुरावला. समाज व धर्मासाठी जगण्यात जीवनाची यशस्वीता आहे. संकल्पांची व्याप्ती वाढविली तर परमेश्‍वर भरभरून शक्ती आणि सामर्थ्य देतो हे त्यांनी स्वामी गोविंद देव गिरी यांच्या उदाहरणाद्वारे पटवुन दिले. कीर्तनासाठी मोठ्या संख्येने स्त्री पुरुष भाविक श्रोते उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.गोविंद महाराज यांनी तरुणांच्या पुढाकार आणि सहभागाने यशस्वीपणे संपन्न झालेल्या या सप्ताह सोहळ्यानिमित्त संयोजक शेजारती भक्त मंडळ व समस्त ग्रामस्थांचे कौतुक केले. काल्याच्या कीर्तनानंतर पाच हजारावर स्त्री पुरुष भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संयोजकांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहकार्य व योगदान दिलेल्या सर्व घटकांचे आभार मानले.

COMMENTS