Homeताज्या बातम्यादेश

श्रेयवादाची लढाई !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची पडघम वाजतांना दिसून येत आहे. त्यातच राज्य सरकारने आणलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

लोकशाहीचा संकोच
सोयीचे राजकारण, मुखवट्याचे धोरण
चंद्रकांतदादांच्या मनातली खदखद

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची पडघम वाजतांना दिसून येत आहे. त्यातच राज्य सरकारने आणलेली महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. योजनेवरूनच सध्या महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र बदलापूर घटनेची, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याला आपण जबाबदार आहोत, त्याचे श्रेय घेण्याची कुणीही तयार नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँगे्रसने आपल्या पक्षाला राज्याला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी जनसन्मान यात्रा काढली. या यात्रेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा पुरेपूर प्रचार केला अर्थात तो योजनेतून मुख्यमंत्री हा शब्द वगळून. त्यामुळे या योजनेवरून श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता आपण अर्थमंत्री असल्यामुळे आपण या योजनेची तरतूद केली, त्यासाठी आपण निधी मंजूर केला अशी वल्गना अजित पवार गटाचे कार्यकर्ते करतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे महायुतीचा कॅप्टन मीच असून, माझ्याच अधिपत्याखाली सर्व योजना सुरू आहे, असा सूर शिंदे गट लावतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे परवाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भाजपच्या पोस्टरवरून अजित पवारांना वगळण्यात आले, याचा अर्थ भाजप अजित पवारांना जशास तसे उत्तर देतांना दिसून येत आहे.
खरंतर अजित पवार महायुतीत असले तरी, ते माघारी कधी फिरतील हे सांगता येत नाही, याची जाणीव भाजपला आहे. किंबहुना तशी वातावरणनिर्मिती भाजपकडून तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची खिचडी झाली आहे. शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादीचे दोन गट आणि भाजप आणि काँगे्रस असे सहा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत. फुटलेल्या दोन पक्षातील चार गटाला आपणच खरा पक्ष असल्याचे दाखवून द्यायचे आहे, त्यासाठीच हा आटापिटा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटापेक्षा शिवसेनेची सरस कामगिरी राहिली आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटापेक्षा शरद पवार गटाची कामगिरी जोरदार राहिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील आघाडी घेण्याची सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा रंगण्याऐवजी ती स्पर्धा महायुतीत रंगतांना दिसून येत आहे. अजित पवारांना भाजपच्या आमदारांचा आणि पदाधिकार्‍यांचा तीव्र विरोध होतांना दिसून येत आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेचे श्रेय आपलेच असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीत श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे अजूनही जागावाटप होत नसल्यामुळे अजित पवार गटात चलबिचल सुरू असल्याचे दिसून येत आहे. कारण राजधानी दिल्लीत देखील अजित पवारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेत जागा वाटप लवकर करा, म्हणजे पक्षाला तयारी करण्यासाठी वेळ मिळेल असा सूर लावला. मात्र त्यांचा हा सूर अजूनही तसास सुरू आहे. जागा-वाटपाचे घोंगडे भाजपने मुद्दाम अडवून ठेवल्याचे दिसून येत आहे. जागावाटप आत्ताच केल्यास मित्रपक्ष बाहेर पडू शकतात, त्यांना तयारी करायला वेळ मिळू शकतो, त्यामुळे निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आणि अवघे काही दिवस शिल्लक असल्यानंतरच पुन्हा एकदा जागावाटप करू असा भाजपचा होरा दिसून येत आहे. त्यातून अनेकांचे परतीचे दोर कापले जाईल आणि बाहेर पडणार्‍यांना इतर पक्षांतून संधी मिळणार नाही अशीच भाजपची इच्छा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीत श्रेयवादाची सुरू असलेली लढाई पुढे जागावाटपाच्या वेळी न रंगल्यास नवल वाटायला नको. कारण महाविकास आघाडी समोर लढण्यासाठी महायुतीत एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीमध्येच खरी लढाई रंगतांना दिसून येत आहे.

COMMENTS