Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘आरटीओ’ कडून 20 हजार वाहनांवर दंडुका

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका

महेश गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
काँग्रेसचे ”शर्म करो मोदी” आंदोलन | LOKNews24
दारू पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. आरटीओच्या ‘वायुवेग’ पथकांनी एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 20 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली आहे.  प्रामुख्याने विमा नसलेली वाहने आणि विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई झाली आहे. आरटीओच्या वायुवेग पथकांनी एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 20 हजार 482 वाहनचालकांवर कारवाई केली. वायुवेग पथकांना आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दंड वसुलीचे 15 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. पथकांनी 15.02 कोटी रुपयांची दंड वसुली करीत 100.15 टक्के कामगिरी केली आहे. त्याआधीच्या वर्षात 2021-22 मध्ये दंड वसुलीचे उद्दिष्ट 11 कोटी रुपये होते आणि प्रत्यक्ष वसुली 10.59 कोटी रुपये होती. आता दंड वसुलीच्या रकमेत 41.90 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

COMMENTS