Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विभागीय महिला भजन स्पर्धेत बर्दापूरचचा संघ प्रथम

परळीचा संघ द्वितीय

अंबाजोगाई प्रतिनिधी - येथील रविवार पेठेतील वीरशैव मठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजित विभागीय महिला भजन स्पर्धेत बर्दापूरच्

अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा का नाही? ; कर्नाटक उच्च न्यायालयाची विचारणा; कोरोनाच्या काळात गर्दी
धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न एका युवकाच्या चांगलाच अंगलट आला
केज येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव ; विविध स्पर्धा बक्षीस वितरण, व्याख्यान कार्यक्रम संपन्न

अंबाजोगाई प्रतिनिधी – येथील रविवार पेठेतील वीरशैव मठात महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजित विभागीय महिला भजन स्पर्धेत बर्दापूरच्या महालिंगेश्वर महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे सात हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिक पटकावले . या भजन स्पर्धेत विविध गावातील एकोणीस संघांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवर्य शंभू लिंग शिवाचार्य यांनी केले . संगीतकार प्रकाश बोरगावकर व डॉ .विनोद निकम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . या स्पर्धेला जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले . भजन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : प्रथम पारितोषिक :महालिगेंश्वर भजनी मंडळ ,बर्दापुर  द्वितीय पारितोषक :संत श्रेष्ट गुरुलिंग भजनी मंडळ ,परळी ,तृतीय पारितोषिक :माहेश्वरी भजनी मंडळ ,नारायण नगर, लातूर उत्तेजनार्थ पारितोषिक :रेणुकाचार्य भजनी मंडळ दत्तमंदीर हौसींग सोसायटी , अंबाजोगाई व केकानवाडी भजनी मंडळ,केकानवाडी. विजेत्यांना प्रसिध किर्तनकार शिवलीला पाटील व श्री . शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते सोमवारी पारितोषिके देण्यात आली.

COMMENTS