बारामती ः बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी पार पडले. मात्र त्यापूर्वी बारामतीचा राजकीय पारा चांगलाच चढल्याचे दिसून येत आहे. कारण इंदापुरातील
बारामती ः बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी पार पडले. मात्र त्यापूर्वी बारामतीचा राजकीय पारा चांगलाच चढल्याचे दिसून येत आहे. कारण इंदापुरातील आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दत्ता भरणे यांचा हा दमदाटीचा व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले आहेत. दत्ता भरणे यांच्या दमदाटीमुळे मतदानादरम्यान राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
यानंतर बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामुळे दत्ता भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केल्यानंतर बारामतीमधील राजकीय वातावरण पेटले आहे. रोहित पवार यांनी याबाबतचा व्हिडिओ समोर आणला. दत्ता भरणे यांनी सुप्रिया सुळे यांच्या गवळी नावाच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली. भरणे यांनी मतदान केंद्रावर या कार्यकर्त्याला दमदाटी केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीत सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, दत्ता भरणे त्यांच्या गावातील आणि आसपासमधील गावातील लोकांना शिवीगाळ करून धमकावत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सुळे यांना मुख्य निवडणूक अधिकार्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भरणे यांनी स्पष्टीकरण दिले होते. मी दोन कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो, असे स्पष्टीकरण भरणे यांनी दिले.
शरद पवार गटाच्या नाना गवळींना शिवीगाळ – इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आला आहे. इंदापूरमधील हा व्हिडीओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे शिवीगाळ करत असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नाना गवळी यांना दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आणि संपूर्ण राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. यानंतर सुप्रिया सुळे थेट कार्यकर्ते नाना गवळी यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. यावेळी गवळींनी घडलेला सर्व प्रसंग सुप्रिया सुळेंना सांगितला. तसेच, यावेळी त्यांचा कंठही दाटला. आपली आपबिती सांगतात त्यांना रडू आवरले नाही. दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केलेला प्रसंग सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
COMMENTS