Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोबरगॅसच्या टाकीत पडून बापलेकासह चौघांचा मृत्यू

बारामती/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील खांडज गावा मध्ये एका गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आ

बाभळगावमध्ये फुले-आंबेडकरी युवा संमेलन !
राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत
Raigad | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न, आरोपीवर गुन्हा दाखल| LOKNews24

बारामती/प्रतिनिधी ः पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील खांडज गावा मध्ये एका गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एक इसम अत्यवस्थ असून त्यास औषध उपचारासाठी बारामतीमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तीमध्ये पिता-पुत्राचा आणि चुलत्याचासह एका व्यक्तीचा समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील खांडज इथे ही घटना घडली.
प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापुराव लहुजी गव्हाणे (सर्व रा. बारामती ,पुणे) असे मृत्यमुखी पडलेल्या इसमाची नावे आहेत. याबाबत मिळालेली अशी की, खांडज येथील 22 फाटा जवळ ब्रिटिशकालीन मेणवली आहे. यामध्ये शेण व कचरा साठलेला होता. हा कचरा साफ करण्यास गेले असताना यामध्ये प्रथम शेतमजूर बाबुराव गव्हाणे हे अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी इतर तिघे गेले मात्र या मेणवलीमध्ये गॅस तयार होऊन चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये प्रकाश आटोळे, बाबुराव गव्हाणे, भानुदास आटोळे आणि त्यांचा मुलगा प्रवीण आटोळे यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावाजवळ असलेल्या 22 फाट्याजवळ ही घटना घडली. मेणवलीत पडल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. चौघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे.

COMMENTS