Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बच्चू कडूंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

मुंबई ः महाराष्ट्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याचा आता प्रघातच पडला आहे. मोठ्या राजकीय पक्षात तर एकापेक्षा

Beed : पाटोदा नगर पंचायतीच्या विरोधात नागरिकांचे धरणे आंदोलन (Video)
पंढरपूर विधानसभेत भाजपला मोठा धक्का ; कल्याणराव काळे हातात घड्याळ बांधणार
शाहू महाराज, व्हीव्हीपॅट आणि स्पायवेअर!

मुंबई ः महाराष्ट्रात प्रत्येक पक्षातील नेत्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्याचा आता प्रघातच पडला आहे. मोठ्या राजकीय पक्षात तर एकापेक्षा जास्त भावी मुख्यमंत्री असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. ते आज सोलापूर जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दरम्यान सोलापूर मधील सात रस्ता परिसरात बच्चू कडू यांचे बॅनर झळकले असून यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

COMMENTS