Homeताज्या बातम्यादेश

मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर बंदी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची माहिती

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पूर्वी विधानसभेच्या निवडणूका घेण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, याठिकाणी निवडण

शहर व परिसरावर पसरली धुक्याची चादर 
पंतप्रधान मोदी, शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
किरीट सोमय्यांना दिलासा ; उच्च न्यायालयात जामीन मंजूर

नवी दिल्ली ः जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पूर्वी विधानसभेच्या निवडणूका घेण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, याठिकाणी निवडणुकीची घोषणेसाठी अजूनही अनुकूल वातावरण नसल्याचे दिसून येत आहे. वाढते दहशतवादी हल्ले, केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवतांना दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी  मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर (मसरत आलम गट) बंदी घातली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात गृहमंत्री शहा म्हणाले की, देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मसरत आलम ग्रुपचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. दहशतवादी कारवायांचे समर्थन आणि लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात. सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे की, आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात काम करणार्‍या कोणालाही सोडले जाणार नाही आणि त्याला कायद्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेची स्थापना मसरत आलम भट्ट यांनी केली होती. 2019 पासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दहशतवादी फंडिंग प्रकरणी 50 वर्षीय मसरतविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS