Homeताज्या बातम्यादेश

उसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी

केंद्र सरकारचा निर्णय ; साखर कारखानदारांना धक्का

नवी दिल्ली ः यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने गुरूवारी उसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी

 शेतकऱ्याने पिकविली मेक्सिकन मिरची
शेतकऱ्यांनी 14 जानेवारीपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत
फलटण तालुक्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून जमिनदोस्त

नवी दिल्ली ः यंदा अपुरा पाऊस झाल्यामुळे ऊसाचे उत्पादन देखील कमी होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने गुरूवारी उसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना मोठा धक्का बसला आहे. साखर उत्पन्नामध्ये घट होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आगामी एका वर्षासाठी ऊसापासून इथेनॉल बनवता येणार नाही. भारतीय बाजारपेठेतल्या साखरेची कमतरता भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतामध्ये निराशाजनक मान्सूनचा फटका ऊसाला बसला आहे, त्यामुळे जगातला दुसरा सगळ्यात मोठा उत्पादक देश असलेल्या भारताने 31 ऑक्टोबरपर्यंत एक्सपोर्टवर बंदी घातली होती. महाराष्ट्रात 2024-25 ची शेती अजून सुरू झालेली नाही. महाराष्ट्रात कमी पाणी असल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पादनात 8 टक्के घसरण झाल्याचा अंदाज आहे. 2023-24 साठी 337 लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारत सरकार साखरेपासून इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येऊ लागल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भावी दर सुमारे 8 टक्क्यांनी घसरले. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. तसेच ऑईल मार्केटिंग कंपन्यांसोबत साखर कारखान्यांनी करार केला आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या मोसमासाठी 31.7 लाख टन साखरेएवढ्या इथेनॉलचा लिलाव झाला आहे. 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या मोसमासाठी आतापर्यंत इथेनॉलची रक्कम ठरवण्यात आलेली नाही. इथेनॉलच्या किंमती कमी करणे किंवा साखर कारखान्यांना इथेनॉलचा जास्त सप्लाय करण्यापासून रोखणे, हे दोन पर्याय सरकारसमोर होते. महागाईवर प्रत्येक आठवड्याला गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या समुहाची बैठक होते, या बैठकीमध्ये याबाबतचे निर्णय होतात. 5 डिसेंबरला झालेल्या मंत्री समुहाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती, त्यानंतर आता सरकारने अधिसूचना काढली आहे.

साखरेचे उत्पन्न कमी होण्याची भीतीमुळे निर्णय – इथेनॉल उत्पादन सीमित केल्यामुळे भारतात साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध राहिल. साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल बनवणे कायम ठेवले असते तर देशात साखरेचे उत्पन्न कमी व्हायची भीती होती. 2023-24 मध्ये साखर उत्पादन कमी झाल्यामुळे चिंता वाढली आहे. तर 2024-25 साठी महाराष्ट्रात ऊसाची शेती सुरूही झालेली नाही. भारतात कमी पावसामुळे ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. इथेनॉलचे उत्पादन सुरू राहिल्यास साखरेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. 2023-24 मध्ये साखरेचे उत्पादन घटल्याने चिंता वाढली आहे.

COMMENTS