Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी

पुणे : नगर रस्त्यावर सुरू असलेले मेट्रोचे काम, उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडी होत आहे. जड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने नगर रस्त्यावर गर

बापरे! सुसाट टेम्पो थेट पान शॉपवर…काळजाचा ठोका चुकला
सिंगल फेजने विद्युत पुरवठा मिळावा यासाठी कोरडगाव ग्रामपंचायत आणि वंचितच्या वतीने महावितरणला निवेदन
मुख्यमंत्री साहेब शेती परवडत नाही , वाईन विक्रीची परवानगी द्या| LOKNews24

पुणे : नगर रस्त्यावर सुरू असलेले मेट्रोचे काम, उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडी होत आहे. जड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होत असल्याने नगर रस्त्यावर गर्दीच्या वेळेत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता जड वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर बंदी घालण्यात आली आहे.
अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, पीएमपी बस, खासगी बस, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून जड वाहनांना नगर रस्त्याचा वापर करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. नगर रस्त्यावर दुतर्फा डंपर, सिमेंट मिक्सर, जेसीबी, रोड रोलर अशी अवजड वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली परिसरातील वाघेश्‍वर चौक, वाघोली ते खराडी बाह्यवळण मार्गावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. केसनंद रस्त्यावरील वाघोली ते शिवाजी चौक ते केसनंद गाव रस्त्यावर जड वाहनांना सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत बंदी राहणार आहे. लोहगाव ते वाघोली ते धानोरी या मार्गावर जड वाहनांना सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाघेश्‍वर चौक, वाघोली ते लोणीकंद रस्त्यावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

COMMENTS