Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौताळा अभयारण्यात 15 सप्टेंबरपर्यंत बंदी

छ.संभाजीनगर ः लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरात पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पर्यटनस्थळांवर जा

अपारंपारिक ऊर्जा वापरास चालना द्यावी : अपारंपारिक ऊर्जा मंत्री सावे
निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संपाची हाक
बांधकाम व्यावसायिकाची जिममध्ये आत्महत्या

छ.संभाजीनगर ः लोणावळ्यातील बुशी डॅम परिसरात पाच जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक पर्यटनस्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गौताळा अभयारण्यात देखील पर्यटकांना 15 सप्टेंबरपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे भर पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची गर्दी गौताळा अभयारण्याकडे वळताना दिसते. मात्र पावसाळ्यात पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने पर्यटकांना याठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

COMMENTS