Homeताज्या बातम्यासंपादकीय

बामनकावा की मराठा जातीयवाद ? 

 ग़ैरों को भला समझे और मुझ को बुरा जाना  समझे भी तो क्या समझे जाना भी तो क्या जाना  चिलमन का उलट जाना ज़ाहिर का बहाना है&nbs

सरकार पाडण्याचे उदात्तीकरण म्हणजे………! 
पुरस्कार वापसी आणि संसदीय समिती ! 
हरितक्रांती  : भारताचे नियोजन, शेतकऱ्यांचे श्रम आणि स्वामीनाथन यांचे मार्गदर्शन!

 ग़ैरों को भला समझे और मुझ को बुरा जाना 

समझे भी तो क्या समझे जाना भी तो क्या जाना 

चिलमन का उलट जाना ज़ाहिर का बहाना है 

उन को तो बहर-सूरत इक जल्वा दिखा जाना 

   मीर मेहदी यांच्या या ओळी आज प्रकर्षाने आठवताहेत. ज्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्या प्रश्नाला सोडविण्यासाठी सर्वाधिक जलद हालचाली जर महाराष्ट्रात कोणी केल्या असतील तर ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदीय मार्गाने जिथपर्यंत आणि ज्या प्रकारे सोडवणे शक्य वाटले, ते सर्व पर्याय, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची समाप्ती होण्यासाठी, जर कोणी युध्द पातळीवर वापरले असतील तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यामागचे मुख्य सूत्रधार देखील देवेंद्र फडणवीस हेच होते. आजच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले, तरी सर्व शक्ती पणाला लावून वेगवेगळ्या प्रयत्नातून मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी खरे प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करित आहेत. असं असताना देखील, जरांगे पाटील एकाएकी देवेंद्र फडणवीस यांना दोषी ठरवून, त्यांचे अर्वाच्य शब्दांत संबोधन करित आहेत.  मुळात मराठा जातीवादातून ते असं करित आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले, असे भासवले असले तरी ते तसे नाही; हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्यांचे खरे दुखणे काल त्यांनी बोलून दाखवले. ते म्हणतात की, मराठा नेतृत्व संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच खेळी करित आहेत. या आरोपात जर खरच तथ्य असते, तर स्वतः जरांगे पाटील हे गरीब मराठा म्हणून आंदोलनात का आले? त्यांच्या आरोपातून हे स्पष्ट होते की, श्रीमंत असणाऱ्या मराठा नेतृत्वाने गरीब मराठांना आरक्षण मिळू दिले नाही. राज्याची राजकीय सत्ता ज्या श्रीमंत मराठा नेतृत्वाने आज पर्यंत आजपर्यंत उपभोगली तेच मराठा आरक्षणाचे खरे शत्रू आहेत, असं परवापर्यंत म्हणणारे जरांगे पाटील काल एकाएकी कसे पलटले? मुळात आज देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व ज्या पध्दतीने महाराष्ट्रात तळपते आहे, ते खरेतर, मराठा समाजाला पाहवेनासे झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करून आज ज्या पातळीवर मराठा आरक्षण आणले, ते यापूर्वीच्या मराठा नेत्यांना शक्य झाले नाही. याचा अर्थ, जे मराठा नेतृत्वाला करणे शक्य झाले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले. यातून मराठा समाजातच फडणवीस यांचे नेतृत्व विस्तारल्याने, प्रस्थापित मराठा नेतृत्व अस्वस्थ झाले आहे. त्यांनीच मग फडणवीस यांची बदनामीची मोहीम आखून त्यात जरांगे पाटील यांना म्होरक्या केले. कोणत्याही गोष्टीसाठी पुरावे लागतात, अशी न्यायाची चौकट म्हणते. परंतु, याच चौकटीत सर्वाधिक आणि सशक्त पुरावा ग्राह्य धरला जातो तो म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा. जरांगे पाटील यांचे कालचे प्रसार माध्यमांसमोर केलेले वक्तव्य, हे परिस्थितीजन्य मानले जाईल. कारण, मराठा आरहणाच्या प्रश्नावर हा माणूस एकाएकी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कसा वळला? यासाठी म्हणायला ते अजय बारस्कर महाराज यांचे नाव घेत आहेत. अजय बारस्कर महाराज यांनी आरक्षण आंदोलनावर भूमिका घेणे, हा त्यांचाही लोकशाही अधिकार आहे. जेव्हा, कोणतीही बाब सार्वजनिक पटलावर घडते, त्यावर व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला असतोच. तसे पाहिले तर बारस्कर महाराज हे जरांगे पाटील यांच्या हिताचेच बोलले. त्यांना उपोषण सोडा अशी विनंती करणे, गैर नाही. याऊलट, जरांगे पाटील यांनी संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जे काही म्हटले त्यावर त्यांनी माफी मागितली. त्यावर आता बोलण्याचे कारण नाही. परंतु, असं का बोलले गेले,  याचे कारण देताना जरांगे पाटील स्वतः म्हणतात की, उपाशी पोटी चीडचीड होते म्हणून. जर, त्यांना उपाशीपोटी चीडचीड होत असेल तर त्यांनी उपोषणाचा मार्ग तरी का पत्करावा? हा खरा प्रश्न आहे. ओबीसी-मराठा हा विरोधाभास जरांगे पाटील यांनी उभा केला. ते सातत्याने म्हणतात की, मराठा समाजाला ओबीसींमधील आरक्षण पाहिजे. कोणत्याही गोष्टीचे काही निकष असतात. निकष हे कायद्याच्या चौकटीत ठरविण्यासाठी समिती अथवा आयोगांची नेमणूक केली जाते. मराठा आरक्षण प्रश्नावर अनेक आयोग नेमले गेले. त्यांनी अनेक क्लृप्त्या करून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. आता तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या नावावर केवळ मराठा आणि ब्राह्मण यांचाच आयोग राहिला, असा आरोप मागासवर्ग आयोगातून बाहेर काढण्यात आलेल्या न्यायमूर्ती चंदुलाल मेश्राम यांनी मागच्या आठवड्यात केला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्ग आयोग पूर्णपणे अनुकूल असावा, असा प्रयत्न केला. यात त्यांची प्रामाणिक इच्छा मराठा समाजाला आरक्षण देणे, हीच दिसते. एवढे करूनही जरांगे पाटील फडणवीस यांच्यावर बामन-कावा असा आरोप करित असतील तर मराठा जातीयवाद यापलिकडे यास अन्य दुसरे नाव देता येत नाही!

COMMENTS