देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः बदलत्या युगात व बदलत्या परिस्थिती मध्ये धार्मिक व संस्कृतिक परंपरा कायम राहव्यात यासाठी बाल संस्कार शिबीर ही काळाची ग
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः बदलत्या युगात व बदलत्या परिस्थिती मध्ये धार्मिक व संस्कृतिक परंपरा कायम राहव्यात यासाठी बाल संस्कार शिबीर ही काळाची गरज बनल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज यांनी केले आहे. देवळाली प्रवरा येथे श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या मोफत बाल संस्कार शिबिराला महंत उद्धव महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी माजी आमदार चंद्रशेखर कदम, श्री त्रिबकराज पायी दिंडी सोहळा समितीचे अध्यक्ष सीताराम पाटील ढूस, आसाराम ढूस,माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, बाबा महाराज मोरे, नामदेव शास्त्री महाराज, सुभाष महाराज विधाटे, मच्छिन्द्र कदम, रामभाऊ चव्हाण, साहेबराव उंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महंत उद्धव महाराज यावेळी म्हणाले की, मनुष्य जिवनात योग्य वेळी झालेले संस्कार हे त्याचे हयात भर परिणामकारक ठरतात व त्यामुळे भावी आयुष्य संस्कारमय, भक्तिमय, शिस्तमय होते. देवळाली प्रवरा शहारात बाल संस्कार शिबाराच्या माध्यमातून धार्मिक शिक्षणाबरोबर मूल्य शिक्षण दिले जात असल्याने आपले आई वडीलाचा आदर करणे, मानवता धर्म जोपसने हे या मुलांना शिकवले जात आहे. हे शिबीर आयोजन करणारे, व शिबिरासाठी योगदान देणार्या सर्व नागरिकांना धन्यवाद दिले. देवळाली येथील शिबीराचा बोध घेउन इतरत्र ही असे शिबीर आयोजित करावे असे आवाहन उद्धव महाराज यांनी केले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले की, सध्याची एकूण समाजाची अवस्था पहिली, अनुभवली तर समाज सुशिक्षित झाला आहे, होत आहे. त्याच्यवेळी समाजाला संस्कृत पणाचा विसर पडत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अश्या परिस्थिती मध्ये देवळाली प्रवरा शहारात आयोजित बाल संस्कार शिबीर हा एक स्तुत्य उपक्रम ठरणारा आहे. या शिबिरा साठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महंत उद्धव महाराज यांना श्री क्षेत्र शिंगणापूर देवस्थानच्या वतीने नुकताच शनिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली प्रवरा शहर वासियांचे वतीने माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी तर मुस्लिम पंच कमेटीच्या वतीने रफिक शेख यांनी महाराजांचा सन्मान केला. बाबा महाराज मोरे यांनी बाल संस्कार शिबिराची माहिती प्रस्ताविक मध्ये दिली. माजी नगरसेवक सचिन ढूस यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दत्ता गागरे, बाबासाहेब सांबारे, अण्णासाहेब महांकाळ, विठ्ठल टिक्कल एल. पी. गागरे, डॉ. साईनाथ वरखडे, संचालक मंजाबापू वरखडे, आदिसह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
बाल संस्कार आयुष्याची शिदोरी
देवळाली प्रवरा येथे श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेच्या वतीने बाल वारकरी संस्कार शिबिर दिनांक 18 मे ते 27 मे रोजी आयोजित शिबिरात हभप बाबा महाराज मोरे, हभप नामदेव महाराज जाधव शास्त्री, हभप सुभाष महाराज विधाटे, दत्ता गागरे यांनी विद्यार्थ्यांना स्लोक, अभंग, गौळणी, हरिपाठ, पाऊली शिकवून दररोज नित्य नियमाने मुलांनी आई वडील आजी आजोबा व वडिलधार्या माणसांच्या पाया पडणे, दररोज जेवण करताना चा स्लोक, झोपण्यापूर्वी चा स्लोक, झोपातून उठल्यावर म्हणण्याचा स्लोक शिकवून आदी मुलांवर संस्कार करण्याचे काम करीत आहेत. बाल संस्कार आयुष्याची शिदोरी ठरणार आहे.शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन ढुस, बाबासाहेब सांबारे, यांच्या सह श्री त्रिंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
COMMENTS