सोनई : पानसवाडी येथील घटनेच्या अनुषंगाने पोस्को कायद्या अंतर्गत शनिशिंगणापूर पोलिस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिस प्रशासनाकडून अट

सोनई : पानसवाडी येथील घटनेच्या अनुषंगाने पोस्को कायद्या अंतर्गत शनिशिंगणापूर पोलिस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिस प्रशासनाकडून अटक झालेल्या इसमांकडून नियमित जामीन मिळण्याकरिता ऍड. गणेश दरंदले, ऍड. मनोज दोंड पाटील व ऍड. खाटीक यांच्यामार्फत नियमित जामीन अर्ज जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सेशन न्यायाधीश, नेवासा यांच्याकडे दाखल करण्यात आला होता.
सदरील तथाकथित गुन्ह्यात आरोपीस 6 एप्रिल 2024 रोजी अटक करण्यात आली होती. सदर प्रकरण 18 एप्रिल 2024 रोजी न्यायालयासमोर सुनावणीस ठेवण्यात आले होते. सदर प्रकरणात आरोपीची बाजू मांडताना ऍड. गणेश प्रभाकर दरंदले यांनी माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुन्हा दाखल करण्यात झालेला विलंब व विलंबनाची कारणे यामध्ये साम्यता दिसून येत नाही, पीडिता व आरोपी हे नात्याने भाऊ बहीण आहेत. सदर घटना ही केवळ आरोपीस त्रास देण्याच्या हेतूने हेतू-पुरस्कृत दाखल केलेली आहे. तसेच दिवाणी वादावर पडदा टाकण्याच्या इराद्याने सदरचा खोटा गुन्हा आरोपी भावावर पिडीतेच्या आईकडून दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात ऍड.गणेश प्रभाकर दरंदले, ऍड. मनोज दोंड पाटील व ऍड. खाटीक यांनी आरोपीतर्फे काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे ऍड. भोरडे यांनी काम पाहिले. माननीय न्यायालयाने ऍड. गणेश दरंदले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून व दाखल कागदपत्रांच्या आधारे आरोपीस अटी व शर्ती घालून नियमित जामीन मंजूर केला.
COMMENTS