Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापूर अत्याचाराचा राहाता शहरामध्ये ठाकरे गटाकडून निषेध

राहाता ः बदलापूर येथे शाळेतील दोन विद्यार्थ्यांनीवर तेथील कर्मचार्‍याकडून अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद बदलापुरा सह राज्यात घडत असून राहा

चांदबिबी महालच्या परिसरात पुन्हा आढळला बिबट्याचा वावर
विद्यार्थिनींनी बनवल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू
पिकांना 25 हजार तर फळबागांना 50 हजार द्या ; अतिवृष्टी-गारपीट नुकसानीच्या भरपाईची मागणी,

राहाता ः बदलापूर येथे शाळेतील दोन विद्यार्थ्यांनीवर तेथील कर्मचार्‍याकडून अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद बदलापुरा सह राज्यात घडत असून राहाता शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत सकाळी 11:00 च्या सुमारास राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून टरबूज फोडून राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.यावेळी तालुका प्रमुख सोमनाथ गोरे म्हणाले की बदलापूर येथे ज्या दोन मुली सोबत जो अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
राहाता शहर प्रमुख सोमवंशी म्हणाले की, बदलापूरची घटना घडली ती माणूकीला काळीमा फासणारी घटना घडली असून सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. राज्याचे अब्रू यांनी चावट्यावर आणून ठेवले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे.  अमोल गायके म्हणाले की, ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला त्यांना फाशीची शिक्षा होऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला गेला पाहिजे. हे सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. यावेळी सुनील परदेशी यांनीही राज्य सरकार व सडकवून टीका केली. हे आंदोलन राहाता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यादरम्यान तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे, तालुका उपप्रमुख दिनेश आरणे, शिर्डी समानवयक सुनील परदेशी, संघटक अमोल गायके,राहाता शहर प्रमुख गोरख वाकचौरे, अमित महाले, वाहतूक सेनेचे संदीप सोनवणे, युवा सेनेचे विकास सोमवंशीअमोल खापटे, सतीश गुंजाळ, शाम गोडगे, शिवाजी मोरे, शब्बीर शेख, कुणाल गोरे, तुषार पठारे आधि जन यावेळी उपस्थित होते.

COMMENTS