अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

पहिली वेळ असल्याने माफ केले रवी राणा वादावर अखेर पडदा

अमरावती प्रतिनिधी- आमदार रवी राणा(Ravi rana ) आणि माजी मंत्री बच्चू कडू(Bachu Kadu) यांच्यात ‘खोक्यां’ वरून वाद रंगला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकना

राणांना तिकीट दिल्यास बंड करू ः बच्चू कडू
बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा
सरकार मजबूत, पण केव्हाही कोसळू शकते : बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी– आमदार रवी राणा(Ravi rana ) आणि माजी मंत्री बच्चू कडू(Bachu Kadu) यांच्यात ‘खोक्यां’ वरून वाद रंगला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या मध्यस्तीनंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत बच्चू कडू यांची माफी मागितली होती. तर, बच्चू कडू यांनी मंगळवारी अमरावतीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत, आमदार रवी राणा यांची पहिली वेळ असल्यामुळे त्यांना माफ करतो, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. कोणीही यावे आणि काहीही म्हणावे एवढे आम्ही सोप्पे नाही. पहिली वेळ असल्याने माफ करतो. पण, यानंतर कोणीही आमच्याविरुद्ध बोलले, तर ‘प्रहार’चा वार दाखवू. आम्ही गांधीजींना मानतो, मात्र भगतसिंह डोक्यात आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. रवी राणांनी दिलगीरी व्यक्त केली, त्याचा आनंद आहे. अन्यथा आम्हाला उगाच अधिक हातपाय हालावावे लागले असते. पण, रवी राणांनी मोठेपणा घेत चूक लक्षात आली आणि माफी मागितली, त्याबद्दल पुन्हा आभार मानतो. आपण दोन पावले मागे घेतले, आम्ही चार पावले माघे घेऊ. विनाकारण आम्हाला उर्जा संपवायची नाही आहे, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. दरम्यान, यावर बोलतांना आमदार रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. बच्चू कडू यांनी माझे आभारही मानले आहेत. त्यामुळे हा विषय इथे संपला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे. आमच्यातला वाद मिटला आहे. असे विषय संपवून पुढे जायला हवे. लोकशाहीत असे घडत असते. शेतकर्‍यांचे, बेरोजगारांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी आता काम करायचे आहे. हा वाद आता संपला आहे, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीत विरोधात उमेदवार उभे केले जाणार आहेत यावर बोलतांना रवी राणा यांनी म्हटले की, माझ्या विरोधात 50 उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले तरी जनता ज्यांच्या सोबत असते, ज्यांच्यावर आशीर्वाद असतात तेच जिंकून येतात. मी मागच्या वेळी 20 ते 22 हजार मतांनी विजयी झालो होतो, याची आठवणही त्यांनी करुन दिली. मी सर्वसामान्यांना मदत करतो, अपंगाना मदत करतो, माजी सैनिकांना मदत करतो. माझा पगार देखील माजी सैनिकांसाठी घर बांधून देण्यासाठी खर्च करतो. गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी काम करतो. म्हणून जनता माझ्यासोबत आहे, असंही रवी राणा यांनी म्हटले आहे.

राजकारण आणि तत्वांची सांगड घालावी लागते – राजकारण हे राजकारणासारखे करावे लागेल आणि तत्त्व हे तत्त्वांसारखी पाळावी लागतील. या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. केवळ तत्त्व पाळत राहिलो आणि काम काहीच केले नाही, तर त्या तत्त्वांना किंमत उरत नाही. लोकांच्या दु:खावर कुठेतरी मलमपट्टी करता आली पाहिजे. आम्ही उगीच गुवाहाटीला गेलो नाही. तेव्हा मी राज्यमंत्री होतो. मंत्री असतानाही मला गुवाहाटीला जाण्याची गरज काय होती. मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभा राहिलो, तो घटक महत्त्वाचा आहे असे बच्चू कडू यांनी यावेळी प्रहारच्या मेळाव्यात स्पष्ट केले.

COMMENTS