Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘आश्रम’ फेम बबिता लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई : 'आश्रम' या वेबसिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देऊन खळबळ म

अन्यथा, जगाचा श्रीलंका होईल !
जातीनिहाय जनगणनेचा स्वीकार -नकारातील वास्तव!
शासन आपल्या दारीतून विकासगंगा लाभार्थ्यांच्या दारी

मुंबई : ‘आश्रम’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री त्रिधा चौधरीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देऊन खळबळ माजवणारी बबिता जी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्वतः त्रिधाने याचा खुलासा केला आहे. त्रिधा चौधरीने सांगितलं की, ती पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. तिने तिच्या लग्नाची सर्व माहिती यावेळी सांगितली आहे.मात्र तिने अद्याप तिच्या भावी पतीचं नाव उघड केलेलं नाही. तिने नुकताच हाही खुलासा केला आहे की, तोही चित्रपटसृष्टीतील आहे. लग्नाबद्दलचा आनंद व्यक्त करत त्रिधा म्हणाली की, आम्ही दोघंही सध्या खूप आनंदी आहोत आणि आम्हाला आमचं नातं खाजगी ठेवायला आवडतं.त्रिधा म्हणाली की, तिला लग्न साधेपणाने करायचं आहे. सर्व काही ठीक झालं तर पुढच्या वर्षी आम्ही लग्न करू, ती असंही म्हणाली, आमचं लग्न गुरुद्वारात होणार आहे.त्रिधा ही कलकत्त्याची रहिवासी आहे. तिचं वय 29 वर्षे आहे. ती लवकरच एका बंगाली सीरीजमध्ये दिसणार आहे.

COMMENTS