Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोधेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब शेळके

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील गोधेगावातील शेतकर्‍यांसाठी आर्थिक कामधेनु ठरलेल्या गोधेगाव कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नामदार श

 गोयकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस इंटरक्टिव पॅनल भेट
राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना
मंदिरातील तीन दानपेटया चोरट्यांनी फोडल्या

भालगाव प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील गोधेगावातील शेतकर्‍यांसाठी आर्थिक कामधेनु ठरलेल्या गोधेगाव कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नामदार शंकररावजी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून सर्वांच्या एकमताने चेअरमनपदी बाबासाहेब शेळके व व्हा. चेअरमनपदी बबन औटे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली.
सोसायटीच्या सदस्यपदी नवनाथ पठाडे, गुलाब सय्यद, तुळशीदास शेलार, अशोक घाडगे, भास्कर घोलप, जालिंदर जाधव, पावळस लासे, बाबासाहेब गाडेकर, प्रेमनाथ पल्हारे, सुलाबाई लक्ष्मन मोटे, सुशीला रामनाथ पठाडे, यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून एस.ए. थोरात यांनी काम पाहिले. गोधेगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दिगंबर शेलार, विक्रम अमृतें, विजय घोलप, दत्तात्रय शेळके, संतोष आबूज, दिलीप शेलार, अशोक औटे, रामनाथ सोनवणे, रावसाहेब अवसळमल, युवा नेते अमोल शेळके, राजेंद्र पठाडे, तसेच भदगले भाऊसाहेब,(सचिव) मच्छिंद्र गुंड, (क्लार्क) आदिंचे विशेष सहकार्य लाभले आहे. निवडणूक शांतपणे झाल्याने ग्रामस्थांनी सदस्यांचे अभिनंदन करुन पुढिल कार्यांस शुभेच्छा दिल्या आहेत तसेच सर्व नवनिर्वाचित चेअरमन व्हा चेअरमन सदस्य याचे विविध स्थरातून अभिनंदन केले जात आहे.

सर्वांच्या विश्‍वासावर संस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे, तसेच या पुढे देखील सुरूच ठेऊ व जास्तीत जास्त नफा शेतकरी वर्गाचा कसा होईल या कडे भर देऊ व सर्वांच्या एक विचाराने निर्णय घेऊन सोसायटीचे ध्येय धोरण चांगले राबवू.
बाबासाहेब शेळके, चेअरमन

COMMENTS