Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बबनराव बाळाजी कुटे यांचे निधन

संगमनेर ः अमृतवाहिनी आयटीआयचे शिक्षक संजय कुटे यांचे वडील व सुकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे खंदे सहकारी बबनर

भाजपात प्रवेश केल्यावर ते साधु संत होतात का? शेट्टी
सातभाई कॉलेजच्या गुणवंतांचा सन्मान
करपडी फाटा ते बाभूळगाव दुमाला रस्त्याची दैना

संगमनेर ः अमृतवाहिनी आयटीआयचे शिक्षक संजय कुटे यांचे वडील व सुकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे खंदे सहकारी बबनराव बाळाजी कुटे यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले आहे. सुकेवाडी गणपती मळा येथील प्रगतशील शेतकरी असलेले बबनराव कुटे हे पुरोगामी विचाराचे आणि स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे खंदे सहकारी. याचबरोबर लक्ष्मणराव कुटे यांच्या बरोबरीने सातत्याने काम करणारे बबनराव कुटे यांनी अत्यंत आणि प्रामाणिकपणे शेती व्यवसाय सांभाळताना कुटे परिवाराला समृद्धतेची आणि संस्काराची दिशा दिली. या परिवारातील शिक्षक संजय कुटे यांच्यासह त्यांचे नातू उच्चशिक्षित करताना वैद्यकीय क्षेत्रात चार नातू डॉक्टर आहेत. तर दोन नातू यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या 95 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याने रविवारी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात मुलगा संजय, तीन मुली, नातू, सुना असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सुकेवाडी परिसरातून मोठी हळद व्यक्त होत असून काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे, गोरख कुटे यांसह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे

COMMENTS