Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीआरएस भाजपची बी टीम : आ. पृथ्वीराज चव्हाण

इस्लामपूर / प्रतिनिधी : बीआरएसचे मुख्यमंत्री राज्यात येतात पण त्यांचा उद्देश भाजपाला मदत करण्याचा दिसतोय. हा पक्ष भाजपाची बी. टिम आहे, असे माजी म

कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी होणार साडेतीनशे रुपयांत : आरोग्यमंत्र्यांची माहिती
बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजूरीच्या पोलीस पाटलाचे निलंबन
आ. शशिकांत शिंदे यांच्या भाजपात प्रवेशादरम्यान स्वागतासाठी आ. महेश शिंदेचे मिठी मारण्याची तयारी

इस्लामपूर / प्रतिनिधी : बीआरएसचे मुख्यमंत्री राज्यात येतात पण त्यांचा उद्देश भाजपाला मदत करण्याचा दिसतोय. हा पक्ष भाजपाची बी. टिम आहे, असे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
ते इस्लामपूर येथे पत्रकार बैठकीत बोलत होते.
चव्हाण म्हणाले, पवारसाहेब 17 किंवा 18 तारखेला राज्यातील दौर्‍याला बाहेर पडणार आहेत. त्यावेळी राष्ट्रवादी सोबत कोण आहे-नाही ते समजेल. केवळ काँग्रेसची मते फोडण्यासाठी बीआरएसची वाटचाल ही भाजपाची चाल आहे. सध्या शिवसेना आणि राष्टलवादी काँग्रेसच्या फुटीमुळे कोण कोणाच्या पक्षात आहेत हेच समजत नाही दक्षिणेत मोदींना रोखले आहे. पुढच्या काही दिवसात चार राज्यातील निवडणुकीत काँग्रेस आपले स्थान कायम राखील. तेलंगणा येथे राहुल गांधी यांच्या सभेला उर्त्स्फूद प्रतिसाद मिळाला. लवकर दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो यात्रा सुरु होईल. अजून उमेदवारीबाबत चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडी सरकार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार असून जेथे ज्या पक्षाचे प्राबल्य आहे. तेथे तो उमेदवार दिला जाणार आहे. सध्या केवळ प्राथमिक चर्चा सुरु आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी संपर्क मेळावे घेतले आहेत. आ. विश्‍वजीत कदम, जितेंद्र पाटील, विजय पवार, राजेंद्र शिंदे, शाकीर तांबोळी आदी उपस्थित होते.

COMMENTS