Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम

500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड श्र प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने

मानधन, सन्मान आणि न्याय मिळेपर्यंत नोटा हाच पर्याय
नांदेड विकासाच्या दिशेने भाजपचा ठाम संकल्प
वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथा शिवसेनेचे बिबटे कार्यालयात सोडू- जिल्हाप्रमुख  बारसे

500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड श्र प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 बाबत जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पिपल्स हायस्कूल, नांदेड येथे  आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह प्रतिबंध कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा किंवा 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा विवाह झाल्याचे आढळून आल्यास संबंधित दोन्ही कुटुंबांवर कारवाई करण्यात येते. यासोबतच विवाहाची व्यवस्था करणारे बँड वाजविणारे, मंगल कार्यालय चालक तसेच विवाहात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींवरही या कायद्यान्वये कठोर कारवाई केली जाते. बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास व एक लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच बालविवाहाबाबत माहिती मिळाल्यास 1098 या टोलफ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. माहिती देणार्‍याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाते, यावर त्यांनी विशेष भर दिला. या कार्यक्रमास पिपल्स हायस्कूलमधील सुमारे 500 शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिपल्स हायस्कूलच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सेलमोकर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.

COMMENTS