Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थीनीस पारितोषिक प्रदान

कोपरगाव : स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी कला शाखेतील कु. स्नेहल बापू त्रिभुवन या विद्यार्थीनीस जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व

कर्जत, जामखेड तालुक्याच्या आरोग्य विषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – आरोग्य मंत्री राजेश टोपे
डॉ. संजय दवंगे यांना शब्दगंधचा ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष’ पुरस्कार
 कर्जतमध्ये श्री संत गोदड महाराज जन्मोत्सव उत्साहात

कोपरगाव : स्थानिक के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील 11 वी कला शाखेतील कु. स्नेहल बापू त्रिभुवन या विद्यार्थीनीस जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे  21000 चे पारितोषिक मिळाल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांनी दिली आहे. जानेवारी 2024 मध्ये पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय जलमित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हातील अनेक महाविद्यालयांतील बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार 27 मार्च रोजी संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. आशिष येरेकर व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कु. स्नेहल बापू त्रिभुवन या विद्यार्थीनीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 21000, करंडक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कु. स्नेहल हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्‍वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर.सोनवणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS