पाथर्डी/प्रतिनिधी ः हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक समजली जाणारी अवलिया बाबा यात्रा मोठया उत्साहात पार पडली.यात्रेचा प्रारंभ राम नवमीला झाला. भाविका
पाथर्डी/प्रतिनिधी ः हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक समजली जाणारी अवलिया बाबा यात्रा मोठया उत्साहात पार पडली.यात्रेचा प्रारंभ राम नवमीला झाला. भाविकांनी पायी चालत जात पैठण येथून कावडीने पाणी आणले होते.त्या कावडीची सायंकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली.रात्री आठ वाजता अवलिया बाबा समाधीला जलाभिषेक करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संदल मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये संगमनेर येथील चार नाचणारे घोडे आणि दि मेलोडी आर्केस्ट्रा पुणे हे प्रमुख आकर्षण ठरले.शनिवारी कुस्त्याच्या हंगाम्याने या यात्रेची सांगता झाली.
यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरु शेठ मस्के यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत सदस्य त्रिंबक दादा देशमुख, प्रताप नाना देशमुख, शंकर मामा ससाणे, नागनाथ वाळके, काकासाहेब देशमुख, अरुण भाऊ मुखेकर, स्वराज बोंद्रे, युनूस भाई शेख, अशोक भाऊ कांजवणे, युसूफभाई टेलर, बबन भाऊ मुखेकर, बाळासाहेब म्हस्के, मुरलीधर काकडे, भाऊसाहेब मस्के, भाऊसाहेब फुंदे, विनायक गुरुजी देशमुख, माऊली देशमुख, राहुल मस्के सर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी यात्रा कमिटीचे नेतृत्व केले. तसेच कोरडगावच्या ऐतिहासिक कुस्त्यांच्या हंगाम्याचं उद्घाटन ह.भ.प.दीपक महाराज काळे,जगन्नाथ महाराज गर्जे,रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान, पत्रकार रमेश देवा जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रातून अनेक नामवंत पैलवानानी या हंगाम्यासाठी हजेरी लावली.या कुस्तीच्या हंगाम्याचा कोरडगाव आणि पंचक्रोशीतील सर्व कुस्तीप्रेमींनी आनंद लुटला.यावेळी दोन हजार रुपयांपासून शेवटची एक लाख रुपयांची कुस्ती जामखेड चा पैलवान कृष्णा खाडे आणि पाथर्डी जाडदेवळे येथील पैलवान कृष्णा गुजर यांच्यात रंगली.कृष्णा गुजरने कृष्णा खाडेला चितपट करत पहिले बक्षीस मिळवले.लहान गटात पैलवान धनराज पवार ,संघर्ष म्हस्के यांच्या कुस्त्यानी प्रेक्षकांची मने जिंकली.यावेळी पैलवानांना पुरस्कार आणि सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर, माजी नगरसेवक तुकाराम भाऊ पवार, पंचायत समिती सभापती गोकुळ भाऊ दौंड, माजी जिल्हा परिषद सदस्य गहिनीनाथ दादा शिरसाठ, शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय राजेंद्रजी दळवी, वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, नेवासाचे बिट्टू भाऊ लष्करे, गणेश महापुरे, जामखेडचे माजी नगरसेवक मोहन पवार, कैलास लष्करे, अर्जुन धायतडक, आकाश गायकवाड, शिंगोरीचे उपसरपंच लक्ष्मण टाचतोडे, बाळासाहेब गर्जे राष्ट्रवादीचे अंकुशराव कासोळे, जिरेवाडी सरपंच मुकुंद आंधळे, पैलवान महेश पवार, पैलवान अफसर तात्या जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात्रा कमिटीला गणेश कचरे, आशीर्वाद कचरे, अश्फाक शेख, कालुभाई शेख, रमेश मोरे यांचे सहकार्य लाभले.
COMMENTS