Homeताज्या बातम्यादेश

सिक्कीममध्ये हिमस्खलन, 7 पर्यटकांचा मृत्यू

150 हून अधिक पर्यटक अडकले ः लष्कराकडून रेस्न्यू ऑपरेशन सुरू

गंगटोक/वृत्तसंस्था ः सिक्कीममध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनात 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, तब्बल 150 पेक्षाही अधिक पर्यटक बर्फात अडकले आहेत. म

श्रीरामपूरमध्ये दूध उत्पादकांचे रास्ता रोको
सुनील वेडेची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
खा. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

गंगटोक/वृत्तसंस्था ः सिक्कीममध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनात 6 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, तब्बल 150 पेक्षाही अधिक पर्यटक बर्फात अडकले आहेत. मृतांमध्ये 1 महिला व एका मुलासह इतर 4 पुरूषांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, भारतीय सैन्य दलाकडून रेस्न्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
ही घटना सिक्कीमचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणार्‍या गंगटोकमध्ये घडली. मंगळवारी दुपारी 12.20 च्या सुमारास गंगटोकला नाथुला पासशी जोडणार्‍या जवाहरलाल नेहरू मार्गावर ही घटना घडली. सिक्कीम पोलिसांनी सांगितले की, मृतांची ओळख पटलेली नाही. पोलिस अधिकार्‍यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गंगटोकला नाथु लाशी जोडणार्‍या जवाहरलाल नेहरूरस्त्यावर झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक लोक बर्फात अडकले आहेत. हिमस्खलनानंतर जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सहा जणांचा मृत्यू झाला.  दुर्घटना घडलेल्या भागात 13 व्या मैलाच्या माइलस्टोनपर्यंत जाण्याचा पास जारी केला जातो. त्यापुढे जाण्याची परवानगी नाही. पण हे पर्यटक जवाहरलाल नेहरू मार्गावरील 14 व्या माईलस्टोनपर्यंत गेले. नेमका तिथेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 22 जणांची सुटका करण्यात आली. यातील 6 जणांना खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना गंगटोकमधील एसटीएनएम रुग्णालय आणि सेंट्रल रेफरल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सिक्किम पोलीस, सिक्किममधील ट्रॅव्हल एजेंट असोसिएशन, पर्यटन विभागातील अधिकारी व वाहन चालकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनजिंग भूटिया यांनी सांगितले की, पर्यटकांना केवळ 13 वे मीलसाठी पास दिले जातात. मात्र पर्यटक विना परवानगी 15 वे मीलकडे जातात. ही घटना 15 व्या मील वर झाली आहे. नाथुला खिंड चीनच्या सीमेवर आहे. तसेच आपल्या सौंदर्याने पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र राहिली आहे.


हिमस्खलनाची भविष्यवाणी शक्य नाही – हिमस्खलन केव्हा व कुठे होईल याची अचूक भविष्यवाणी अजून वैज्ञानिकांना करता आली नाही. ते केवळ बर्फाचे ढीग तापमान व हवेच्या स्थितीवरून हिमस्खलनाच्या धोक्याचा इशारा देतात. स्कीइंगचे आयोजन होणार्‍या काही बर्फाळ भागात हिमस्खलन कंट्रोल पथक तैनात असतात. स्कीइंग भागातील हिमस्खलन रोखण्यासाठी गस्ती पथक स्फोटकांचा वापर करते. ते कोणत्याही धोकादायक उतार असलेल्या ठिकाणचा बर्फ तोफांनी उडवून देतात. कॅनडा व स्वित्झरलँडमदील उंच डोंगरावरील हिमस्खलन रोखण्यासाठी स्पेशल मिलिट्री तैनात असते. स्वित्झर्लंडच्या अनेक डोंगराळ गावातील घरांना वाचवण्यासाठीही मजबूत संरचना उभी केली जाते.

COMMENTS