Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबाद जिल्हा कुपोषणाच्या विळख्यात

तब्बल साडेसात हजारांवर बालके आढळली कुपोषित

औरंगाबाद/प्रतिनिधी ः कोरोनाच्या काळात जशी अनेकांची गैरसोय झाली, तशीच सर्वाधिक गैरसोय ही लहान बालकांची झाली. घरातील कमावत्या व्यक्तीला रोजगार नसल्

आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद
सगे-सोयर्‍यांना जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ
मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील : डॉ. भागवत कराड

औरंगाबाद/प्रतिनिधी ः कोरोनाच्या काळात जशी अनेकांची गैरसोय झाली, तशीच सर्वाधिक गैरसोय ही लहान बालकांची झाली. घरातील कमावत्या व्यक्तीला रोजगार नसल्यामुळे अनेकजण आपल्या चिमुरडयाला पोषक आहार देऊ शकले नाही, त्यामुळे काही महिन्यापूर्वीच मेळघाटात कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे वास्तव्य समोर आले होते. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात देखील हजारो बालके कुपोषित आढळली होती. त्यानंतर सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर कुपोषित बालके आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला शून्य कुपोषणाचा स्तर गाठता आलेला नाही. बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा केल्या जातो तसेच अंगणवाडीत दर महिन्याला या बालकांची वजन व उंचीची नोंद घेत, त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील राबवल्या जातात. ज्यात बालकांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोषण अट्रॅकर अ‍ॅपद्वारे प्रशासन आणि शासनापर्यंत पोहचवली जाते. मात्र असे असतांना देखील एका तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेर्‍यात अडकल्याचे दिसून आले आहे. 17 ते 30 नोव्हेंबरदरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. या मोहीमेसाठी 305 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने वेगवेगळ्या अंगणवाडीला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान पोषण आहारसोबतच बालकांची तपासणी करण्यात आली. ज्यात  त्यांच्या वजन व उंचीच्या नोंदीही घेण्यात आल्या होत्या. या मोहिमेनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गंभीरपणे तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 1202 बालके, तर मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 6416 बालके आढळून आली आहेत

प्रशासनाकडून 84 दिवसांचा कृती कार्यक्रम – औरंगाबाद जिल्ह्यात साडेसात हजारांवर कुपोषित बालके आढळल्यानंतर प्रशासन जागे झाले असून, जिल्हा परिषद व बाल विकास विभागाकडून सॅम आणि मॅम बालकांसाठी 84 दिवसांचा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत या बालकांना कुपोषणातून बाहेर काढून सामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली आहे.

COMMENTS