HomeUncategorized

औंधची पोलीस वसाहत फळा-फुलांनी बहरणार ; पोलीस वसाहतीत 100 झाडांची लागवड

औंध : पोलीस वसाहतीत विविध प्रकारच्या झाडांचे रोपण करताना पोलीस कर्मचारी औंध / प्रतिनिधी : मुळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या औंध पोलीस वसाहतीच्य

1 जुलैपासून एकल वापर प्लास्टिकवर बंदी : शेखर सिंह
प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा


औंध / प्रतिनिधी : मुळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या औंध पोलीस वसाहतीच्या परिसरात सर्व पोलिस कर्मचार्‍यांनी मिळून विविध प्रकारच्या 100 झाडांचे वृक्षारोपण केले असून काही वर्षातच ही वसाहत फळा-फुलांनी बहरणार आहे. त्यामुळे औंधच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
औंध येथे नव्यानेच कार्यभार घेतलेले सपोनि प्रशांत बधे यांनी वसाहतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे. येथील वसाहत निसर्गरम्य करण्याची त्यांचे नियोजन आहे. त्याप्रमाणे त्यांनी औंधच्या पोलीस वसाहतीच्या पुढील मोकळ्या जागेत आंबा, सीताफळ, चिकू, वड, पिंपळ, लिंब यासारखी 100 झाडे लावली आहेत. त्या सर्व झाडांना ठिबकद्वारे पाणी देण्याचे नियोजन केले आहे. याकामी सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी श्रमदान केले असून सर्वांनी ही झाडे लावण्यासाठी मेहनत घेतली आहे.

वसाहतीत 300 झाडे लावण्याचे नियोजन-आता याठिकाणी 100 झाडे लावून त्यांच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आणखी काही दिवसात 100 व त्यानंतर पुढील टप्प्यात 100 अशी एकूण 300 झाडे लावण्यात येणार आहे. त्यामुळे वसाहत हिरवाईने नटणार आहे.


वृक्षारोपणा बरोबरच वृक्ष संवर्धन महत्वाचे असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लावलेल्या 100 झाडांच्या संवर्धनासाठी ज्या-ज्या बाबी आवश्यक आहेत ते सर्व नियोजन केले आहे. याकामी सर्व पोलीस कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. आणखी वृक्षारोपण करण्यासाठी आमची तयारी सुरू आहे.
श्री. प्रशांत बधे
सपोनि, औंध.

COMMENTS