Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक

धुळे/प्रतिनिधी ः नाशिक विभागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून लाच घेणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणतांना दिसून येत आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासू

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राहटी बु. येथे उद्या होणार साजरी  
निराधार योजनेचा नाही आधार
इंदापूर तालुक्यात निवडणुकीनंतर गोळीबार

धुळे/प्रतिनिधी ः नाशिक विभागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून लाच घेणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणतांना दिसून येत आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून अनेक अधिकार्‍यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा नगरपरिषदेच्या व्यापारी गाळ्याला नाव लावून अनामत रक्कम वर्ग करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना सहकारी संस्थेच्या विशेष लेखा परीक्षकाला येथील बसस्थानकात पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यास पोलिसांनी अटक केली.  
जळगाव जिल्ह्यातील सावदा येथील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था अवसायानात निघाली. या संस्थेची व्यापारी गाळ्याची भरलेली सुरक्षा अनामत रक्कम संस्थेचे तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी तीन लाख 85 हजार रुपये रोखीने भरुन व्यापारी गाळा तक्रारदाराला दिला होता. काही दिवसांनी प्रशासक बागल यांची बदली झाली. त्यांच्या जागी धुळ्यातील सहकारी संस्थेचे (प्रक्रिया) विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे यांची नेमणूक झाली. जळगावच्या तक्रारदाराने नगरपरिषदेच्या दप्तरी नाव लावून संस्थेच्या गाळ्याची सुरक्षा अनामत रक्कम वर्ग करुन देण्याची ठाकरे यांच्याकडे मागणी केली. त्यासाठी ठाकरे याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.  या प्रकरणी तक्रारदाराने धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकामार्फत पडताळणी केली. नंतर उपअधीक्षक पाटील, पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने धुळे मध्यवर्ती बसस्थानकात लाचखोर सखाराम ठाकरे याला पाच लाखांची लाच घेताना पकडले.

COMMENTS