Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतवाली पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव

ओळख पटवून १५ दिवसाच्या आत वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

अहमदनगर : कोतवाली पोलिस ठाण्यात सन १९७५ ते २०२३ या दरम्यान वेगवेगळया गुन्ह्यात जप्त झालेली वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने लिलाव होणार आह

प्रहार च्या संघटकपदी तिपायले यांची नियुक्ती
नगरमध्ये पेट्रोल भावाचा भडका, 119 रुपये व डिझेल 101 रुपये
ढवळपुरीत ‘रेकॉर्ड ब्रेक’ लसीकरण, एकाच दिवसात तब्बल अकराशे नागरिकांनी घेतली लस.

अहमदनगर : कोतवाली पोलिस ठाण्यात सन १९७५ ते २०२३ या दरम्यान वेगवेगळया गुन्ह्यात जप्त झालेली वाहने व बेवारस वाहनांचा शासकीय पद्धतीने लिलाव होणार आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पंधरा दिवसाच्या आत ओळख पटवून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

    कोतवाली पोलिस ठाण्यात पडून असलेल्या १६० दुचाकी वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी व मूल्यांकन करण्यात आले आहे. वाहनांचे लिलाव होणार असल्याचे उद्घोषणापत्र १५ सप्टेंबर २०२३ रोजी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत १६० दुचाकी वाहनांचा शासकीय नियमानुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे परवानगीने लिलाव करून येणारी रक्कम शासन जमा करण्यात येईल. 

नागरिकांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख तनवीर (मो. ९९२३७०७१७०) व पोलिस हवालदार दिपक साबळे (मो. ९३७०८०४५४७) यांच्याशी संपर्क करावा. यापूर्वी सुध्दा वाहने घेऊन जाण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. १२५ पेक्षा जास्त वाहने मूळ मालकांना परत करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

COMMENTS