माजलगाव प्रतिनिधी - गायरान धारक व भूमिहीन यांच्या न्याय व हक्कासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीन

माजलगाव प्रतिनिधी – गायरान धारक व भूमिहीन यांच्या न्याय व हक्कासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव हत्याकांडातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने माजलगाव तहसील कार्यालयावर दिनांक 15 जून 2023 गुरुवार रोजी भव्य एल्गार मोर्चा निघणार आहे. या भव्य एल्गार मोर्चात माजलगाव तालुक्यातील तमाम गायरानधारक आणि भूमिहिन सह सर्व रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजलगाव आरपीआय चा तालुका सचिव राजु तुपारे यांनी केले आहे. या एल्गार मोर्चा चे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माजलगाव चे तालुका अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अविनाश जावळे करणार आहेत.ङ्गहा एल्गार मोर्चा नवीन बसस्थानक येथून निघणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजार रोड मार्गे तहसिलवर धडकणार आहे.
COMMENTS