Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुचाकी घासली म्हणून तरुणाचा खूनाचा प्रयत्न

पुणे/प्रतिनिधी ः दोन दुचाकी एकमेकाला घासल्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांनी एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला करून त्याच्या खूनाचा प्र

८.२१ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड
स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येणार : मंत्री विजय वडेट्टीवार
नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या मादी चित्ता साशाचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः दोन दुचाकी एकमेकाला घासल्याच्या कारणातून झालेल्या वादात दोघांनी एका तरुणावर धारधार शस्त्राने खूनी हल्ला करून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. ही घटना सोमेश्‍वर मंदिराजवळ पाषाण परिसरात घडली आहे. गौरव संभाजी काकडे (वय.-31,रा. सोमेश्‍वरवाडी पाषाण) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी, काकडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार राज मानवतकर (वय-20,रा. संजय गांधी वसाहत लमाण तांडा पाषाण ) आणि त्याचा साथीदार अशा दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र असे दोघेजण दुचाकीवरून निघाले होते. त्यांची दुचाकी आरोपी मानवतकर याच्या दुचाकीला घासली. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी मानवतकर याने मी या एरियाचा भाई आहे, आता तुला दाखवतो असे म्हणून धारधार शस्त्राने फिर्यादीवर वार केले. त्यानंतर कोणी मध्ये पडले तर एकाएकाचा काटा काढील असे म्हणून जोरजोरात आरडा-ओरडा करून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

COMMENTS