आमदार विखेंच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार विखेंच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी : भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांच्या हा

रस्ता ओलंडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
नगरच्या दोघांनी केली साडेनऊ कोटींची फसवणूक ;गुन्हा दाखल
सामाजिक भावनेतून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने बुजवला

अहमदनगर/प्रतिनिधी : भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांच्या हाती कोणताही मौल्यवान ऐवज लागला नाही. ही घटना श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर 7, प्रवरा हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. आ. राधाकृष्ण विखे यांच्या बंगल्याच्या दरवाजाच्या कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी बंगल्यातील कपाटांची उचकापाचक केली. कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकले. बंगल्यात कुठलीही मौल्यवान वस्तू नसल्याने या चोरीच्या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी भगवान दामू आसकर (वय 62, रा. लोहगाव, प्रवरानगर, ता. राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरिक्षक संजय सानप करीत आहे.

COMMENTS