Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न

धक्कादायक ! रायगड जिल्ह्यातील कोंढावळे गावातील घटना

मुंबई ः आधुनिक जगात आजही अनेक ठिकाणी मुलीला कोणती वागणूक देण्यात येते, यासंदर्भातील धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एकवीस वर्षाच्या मुलीला जमिनीच्

महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल
मैत्रिणींचे फोटो प्रियकरास पाठवणार्‍या तरूणीवर गुन्हा
वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

मुंबई ः आधुनिक जगात आजही अनेक ठिकाणी मुलीला कोणती वागणूक देण्यात येते, यासंदर्भातील धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एकवीस वर्षाच्या मुलीला जमिनीच्या वादातून चक्कत शेतात जिवंत गाडण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. याप्रकरणी संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्दमध्ये ही घटना घडली असून 21 वर्षीय मुलीचे नाव प्रणाली बबन खोपडे असे आहे. या मुलीच्या आईने धाव घेतल्यामुळे ही मुलगी वाचली आहे. याप्रकरणी मुलीची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये मुंबई शिवडी येथील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैय्या घटनास्थळी उपस्थित होता. त्याने या ठिकाणी दहशत निर्माण करून ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलीला गाडण्याचा प्रयत्न करत दुसर्‍या महिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीच्या आईने वेळीच हस्तक्षेप करत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या साह्याने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले. या प्रकरणी प्रणाली आणि तिच्या आईने वेल्हे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.

15-16 गावगुंडानी केला हल्ला – काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील जवखेडा येथे कुंभार समाजातील कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आला आहे. रायगडमधील घटनेनंतर मुलीच्या आईने सांगितले की, मी व माझ्या दोन मुली प्रणाली व प्राजक्ता आम्ही तिघी शेतात काम करत असताना एकाने पंधरा ते सोळा गुंड पाठवले आणि ही जमीन आमच्या नावावर झाली आहे असा दावा करत आम्हाला शेतातून जायला सांगितले. यावेळी माझी मुलगी प्रणालीने विरोध केल्यावर तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न करत तिला जमिनीत गाडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

COMMENTS