Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पार्किगच्या वादातून महिलेला जिंवत जाळण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोयता गँगचा उच्छाद सुरू असतांना, पुण्यात पार्किंगच्या वा

शुटींगबाँल स्पर्धेत मुलींच्या गटातुन अमरावतीने, मुलांमध्ये नाशिक विभागाने मैदान मारले
दिव्यांगांना अंत्योदय योजनेप्रमाणे धान्य मिळणार
पवन खेरा अटकेचा अन्वयार्थ ! 

पुणे : पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोयता गँगचा उच्छाद सुरू असतांना, पुण्यात पार्किंगच्या वादातून काही टोळक्याने एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र, तिच्या गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार धीरज दिलीप सपाटे (वय 28, नं 1 लेन नं 1 तुकारामनगर खराडी), आकाश सोकीन सोदे (वय 23, रा चंदननगर), नयत नितीन गायकवाड (वय 19, रा साईनाथनगर वडगाव) सुरज रविंद्र बोरुड़े (वय 23, रा उबाळेनगर), विशाल ससाने वय 20 रा बीजेएस कॉलेज जवळ वाघोली) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर धीरज सपाटे हा फरार असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या घटनेची हकिगत अशी की, महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पार्किंग वरुनवाद सुरू होते. 17 फेब्रुवारी रोजी हा वाद टोकाला गेला. यावेळी आरोपी आणि त्याच्या 13 साथीदारांनी दुचाकीवर येत फिर्यादी यांच्या कारच्या काचा फोडल्या. ऐवढेच नाही तर आरोपीनी, त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला.

COMMENTS