Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी शेतकाऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न.

भूषण नामदेव पाटील असे आत्मदहन करणाऱ्या तरुणाचे नाव

जळगाव प्रतिनिधी  -  भूषण नामदेव पाटील तालुका भडगाव येथील या तरुणाने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळीच पोलि

महाराष्ट्र शासनाचे १५ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
एक्सेल तुटल्याने एसटी बस पलटी
35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.

जळगाव प्रतिनिधी  –  भूषण नामदेव पाटील तालुका भडगाव येथील या तरुणाने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र वेळीच पोलिसांच्या  निर्देशनास आल्याने  त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून आत्मदहनासाठी आणलेले पेट्रोल आगपेटी जप्त करण्यात आली. यावेळी आत्मदहन करणाऱ्या तरुणाने पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,  मी अनेकदा भडगाव  येथील बस स्टॅन्डला लागून असलेल्या अतिक्रमण विषयी ग्रामसेवक, मुख्याधिकारी, अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून त्यांच्याकडून ही अरेरावीची भाषा वापरण्यात आली.शासनाला वारंवार सूचना देऊन देखील त्या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केल्यचे सांगितले.

COMMENTS