Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनियुक्त पोलिस अधीक्षकांवरच हल्ला

बुलडाणा शहरातील घटनेने खळबळ

बुलडाणा : शहरात अवैध शस्त्र विक्रेत्याकडे छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल

तीस लाख गुलाब जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
FILMY MASALA : चुकीचा सल्ला देऊ नका’ म्हणत फोटोग्राफर्सवर संतापली जान्हवी कपूर lLokNews24
समान नागरी कायद्यासाठी 4 मंत्र्यांची समिती

बुलडाणा : शहरात अवैध शस्त्र विक्रेत्याकडे छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात दोन पोलिस अधिकार्‍यांसह एक कर्मचारी जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यात पोलिसांनी प्रतिकरासाठी गोळीबार देखील केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवनियुक्त पोलिस अधीक्षकांवर पहिल्याच दिवशी हा हल्ला करण्यात आल्याने गुन्हेगारांना कायद्यासह पोलिसांचीही भीती उरलेली नाही का? असा सवाल या निमित्याने उपस्थित केला जात आहे.      
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात अवैध शास्त्राचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्री म्हाडा कॉलनी परिसरातील मनोजसिंग टाक याच्या घराजवळ गेले, दरम्यान लपून बसलेल्या आरोपी मनोजसिंग टाक याने पोलीस पथकावर तलवारीने हल्ला केला. यात एक सह्यय्यक पोलिस निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी असे तिघे गंभीर जखमी झालेत. त्यावेळी सोबत असलेल्या एका पोलिस कर्मचार्‍याने बचावासाठी आपल्या एसएलआर रायफलीतून तीन राऊंड आरोपीच्या दिशेने फायर केले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी मनोजसिंग टाक फरार झाला आहे. सध्या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहे. यात आर्म अ‍ॅक्टनुसार ही गुन्हा दखल केला आहे. रविवारी सकाळी पोलिसांनी याच परिसरात छापा टाकून अनेक शस्त्रे जप्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र, मध्यरात्री झालेल्या पोलिस पथकावरील हल्ला आणि गोळीबाराच्या घटनेने नवनियुक्त पोलिस अधीक्षकांना गुंडांनी एकप्रकारे सलामी दिल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS