Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साळवे कुटुंबावर हल्ला दोन्ही आमदार गप्प का? :- दिपक केदार

जामखेड : रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला. कुटुंबातील लोक गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. १२ दिवस झाले तरी य

सावित्री नदीत बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
अहिल्यानगर शहर विभागाकडून १ सप्टेंबरला गो ग्रीन नोंदणी शिबिर
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत रु. ९ कोटी  निधीला मंजुरी : आ. काशिनाथ दाते

जामखेड : रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला. कुटुंबातील लोक गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. १२ दिवस झाले तरी येथील कोणताही आमदार  साळवे कूटुंबाच्या चौकशीसाठी गेले नाहीत. याबाबत तीव्र शब्दात ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड अरूण जाधव यांनी घणाघात केला. साळवे कुटुंबावरील हल्ल्याच्या गुन्ह्यातील ६ आरोपींना अटक केली असुन उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी यासाठी दि ७ सप्टेंबर रोजी जामखेड येथे रास्ता रोको व जामखेड बंद आंदोलन करण्यात आले.  यावेळी ते बोलत होते. 
जामखेड बंदला व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी जामखेड शहरातुन निषेध फेरी काढून खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी समस्त भिमसैनिक जामखेड तालुका व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाचे नेतृत्व ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अँड.अरुण जाधव होते. या मोर्चाचे आयोजन विकी भाऊ सदाफुले यांनी केले होते.

या वेळी माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, राजन समिंदर सर, रवी सोनवणे, किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे,जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले,सचिन (जॉकी) सदाफुले, माजी संचालक सागर सदाफुले,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुरेखाताई सदाफुले,रोहीणी सदाफुले आदी मान्यवरांसह समाज बांधव हजारोंच्या संख्येने बांधव उपस्थित होते. जामखेड कडकडीत बंद होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.  यावेळी साळवे कुटुंबावरील उर्वरित हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी. साळवे कुटुंबावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा. या कूटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या. 

COMMENTS