Homeताज्या बातम्यादेश

आतिशी यांनी घेेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी आतिशी मार्ले यांनी दिल्लीच्या 17 व्या मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज निवास येथे एलज

राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झाडाझडती
मणिपूरमध्ये पुन्हा तणाव
संघर्षातुन माझ्या राजकीय जीवनाची सुरु

नवी दिल्ली ः राजधानी दिल्लीमध्ये शनिवारी आतिशी मार्ले यांनी दिल्लीच्या 17 व्या मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज निवास येथे एलजी विनय सक्सेना यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधीनंतर आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पायाला स्पर्श केला. त्या दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसर्‍या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत.
आतिशी यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनी महिला मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला आहे. आतिशी यांच्यानंतर सौरभ भारद्वाज. गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात मुकेश अहलावत हे एकमेव नवीन चेहरा आहेत. 43 वर्षीय अतिशी कालकाजी मतदारसंघातून तीन वेळा आमदार आहेत. आतिशी यांनी केजरीवाल यांचा दिल्लीचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही मोडला आहे. अतिशी 43 वर्षांच्या आहेत, तर केजरीवाल 2013 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा 45 वर्षांचे होते. 17 सप्टेंबर रोजी केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आप आमदारांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांचे नाव निश्‍चित केले होते. आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आतिशी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

COMMENTS