Homeताज्या बातम्यासंपादकीय

आठवडा उलटूनही मुख्यमंत्री ठरेना!

अभूतपूर्व विजय संपादन करूनही महायुतीचा मुख्यमंत्री अद्यापही ठरत नसल्याने, नेमका काय निर्णय होईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  महाराष्ट्र

मा.सुनिल चव्हाण यांनी केली आष्टी तालुक्यातील पीक पाहणी
‘जवान’ चा दमदार ट्रेलर रिलीज
लेखी आश्‍वासनानंतर श्रीगोंद्यातील वीज प्रश्‍नांवरील आंदोलन स्थगित

अभूतपूर्व विजय संपादन करूनही महायुतीचा मुख्यमंत्री अद्यापही ठरत नसल्याने, नेमका काय निर्णय होईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर युतीतील तिन्ही पक्षांचे राज्यस्तरीय नेते यांच्यापैकी कोणीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही काय? अशी एक चर्चा धिम्या स्वरात होतेय. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, अशा बातम्या काल प्रसारमाध्यमातून मोठ्या प्रमाणात आल्या. परंतु, त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या तीनही नेत्यांची होणारी बैठक सोडून, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावी रवाना झाल्यामुळे, ही बैठक रद्द झाली. आता दोन दिवस यावर मात्र कोणताही निर्णय होणार नसल्याची चर्चा आहे. नेमका मुख्यमंत्री पदाचा घोळ का होतो आहे, यावर महाराष्ट्रात विचार होत आहे. अर्थात, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री राहिले. त्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले. परंतु, फडणवीस यांना मुख्यमंत्री ठरवत असताना, अमित शहा अचानक महाराष्ट्रातीलच भाजपचे नेते आणि सध्या केंद्रात जबाबदारी सांभाळत असलेले विनोद तावडे यांना भेटले. तेव्हापासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील फडणवीस यांचे नाव मागे पडले असल्याची एक सुप्त चर्चा सुरू झाली आहे. कदाचित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर मोदी शहा यांना तिसरीच व्यक्ती पाठवायची असेल, असा एक कयास लावला जातो आहे. मात्र, तिसरी व्यक्ती पाठवताना महाराष्ट्रात ओबीसी समुदायाने महायुतीला आणि खास करून भाजपला जो भरभरून पाठिंबा दिला आहे, तो देखील लक्षात घेतला जाईल. त्यामुळे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवडीसाठी मोदी आणि शहा धक्का तंत्राचा वापर करू शकतील, अशीही एक शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ओबीसी नेत्याचा विचार केला जातोय की काय, अशीही शक्यता नाकारता येत नाही. अभूतपूर्व बहुमत मिळाल्यावर ही आठवड्यापेक्षा अधिक कालावधी मुख्यमंत्री ठरवण्यासाठी जेव्हा जातो आहे, तेव्हा होणारा निर्णय हा रुटीन पद्धतीचा नसेल! तो निश्चितपणे धक्कादायक असेल; ही बाब महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय जाणकाराला जाणवते आहे. परंतु, निश्चितपणे मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचे नाव असेल, हे देखील अद्याप मात्र गुलदस्तात राहिलेले आहे. अर्थात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद जाहीर झाल्यानंतर सरकार गठनापासून अवघ्या काही महिन्यात  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावल्या जातील. या निवडणुका राज्यामध्ये जिंकून देणारा नेता भाजपाला हवा आहे. त्याचबरोबर महायुतीच्या एकूण जागांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्यामुळे, मुख्यमंत्री त्यांचा असावा ही भावना नेमकी जोर पकडते आहे. पण, अशावेळी मोदी शहा हे धक्का तंत्राचा वापर करतील आणि एखादं नवं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येईल ही शक्यताही नाकारता येत नाही. अर्थात, महाराष्ट्रामध्ये सध्या कोणतेही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही आणि ना राष्ट्रपती राजवट सुरू आहे. केवळ, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे नियुक्त आहेत आणि काळजीवाहू मुख्यमंत्री मात्र नेमक्या त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे महाराष्ट्र ची राजधानी सध्या तरी नेतृत्वाशिवाय आहे. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर मानले जाते आहे. अशा प्रकारे सत्ताप्रमुखांनी हंगामी प्रमुख नियुक्त केला जात नसताना, राजधानी जोडणे हे देखील गंभीर मानले जाते. असा प्रकार सत्तापदात होत नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये होत नाही. कारण, राज्याच्या प्रमुखांनीच राज्याची राजधानी सोडली तर राज्याचा गाडा नेमका हाकायचा कुणी; हा देखील महत्त्वाचा भाग असतो. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी त्यांच्या मूळ गावी गेले असले तरी, राज्यामध्ये नेमकं सत्ता कोण चालवत आहे का, राज्याची सुरक्षा नेमकी कोण सांभाळत आहे? हाही भाग निश्चितपणे गंभीर आहे! परंतु, यावर नागरिकांना अधिक माहिती नसल्यामुळे यावर बोलत नाहीत. परंतु, सरकारच्या रचनेनुसार सरकारचे प्रमुख अन्य कोणालाही हंगामी प्रमुख बनवले जात नसताना ते राजधानी सोडू शकत नाही, हा नियम आहे. हा नियम आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी पाळलेला आहे. 

COMMENTS